शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील ६ सराईत गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 04:15 IST

तलवार,सुरा आणि चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क जप्त

ठाणे : पाचपाखाडीतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना नौपाडा पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवार,सुरा आणि चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क असा ऐवज जप्त केला असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील बहाद्दूरसिंग मेहरा याला वागळे इस्टेट पोलिसांनी तडीपार केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांना सिद्धेश्वर तलाव परिसरात काही इसम दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ठाण्याच्या नुराबाब दर्गा रोड येथे राहणाऱ्या निहार भालचंद्र बेलोसे (२१), मुंबईच्या सायन येथील धीरज सायमन जॉनअप्पा (२४),वागळे इस्टेट येथील बहाद्दूरसिंग मातबरसिंग मेहरा (२३), दिव्यातील सोनू राजेंद्र मिश्रा (३४) , वसंतविहार येथील प्रणिल प्रकाश साळवी (३३) आणि तुळशीधाममधील दीपक भिकाजी गायकवाड (३१) अशा सहा जणांना पळून जाताना अटक केली. त्यांच्याकडून तलवार, सुरा ही हत्यारे, चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी पाचपाखाडी येथील भूषण ज्वेलर्स दुकानात दरोडा घालण्याची पूर्वतयारी केली होती.याप्रकरणी त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निहार याच्यावर गाडी जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर धीरज यांच्याविरोधातही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. ही कारवाई, पोलीस उपनिरीक्षक कवळे ,पोलीस हवालदार सुनीर अहीरे आदी पथकाने केली.