शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सहा पोलिसांना कोरोनाची लागण; ठाण्यात आतापर्यंत २७५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:12 IST

१९३ जणांनी केली मात

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले. आतापर्यंत २६ अधिकाऱ्यांसह २७५ पोलीस बाधित झाले असून तब्बल १९३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही पोलिसांमध्ये अधिक असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचा बंदोबस्तही कमी केला आहे. तरीही दाटीवाटीची वस्ती तसेच रुग्णांची संख्या लक्षणीय असलेल्या भागातील पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे एक सहायक पोलीस निरीक्षकास १३ जून रोजी त्रास झाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निआॅन रुग्णालयात दाखल केले आहे.बाजूच्याच डायघर पोलीस ठाण्यातील एक पोलीस हवालदार आणि दोन पोलीस नाईक अशा तीन कर्मचाऱ्यांनाही १३ जून रोजी निआॅन रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याआधी राबोडी पोलीस ठाण्यातील हवालदार आणि उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षातील एका महिला कर्मचाºयाचाही १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.या सहा पोलिसांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेतली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.आतापर्यंत २६ पोलीस अधिकारी आणि २४९ कर्मचारी अशा २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या सहा अधिकारी आणि ७४ कर्मचारी अशा ८० पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तब्बल २० अधिकारी आणि १७३ कर्मचारी अशा १९३ पोलिसांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाणही चांगले असल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या