शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलावर सहा तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST

एसटी बस बंद पडल्याने फटका । वाहनचालक, प्रवाशांचे झाले हाल

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडल्याने त्यावरील वाहतूक शेजारील पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने तेथे नेहमी वाहतूककोंडी होते. त्यातच, शनिवारी नेमकी पुलावरच शीळहून कल्याणकडे येणारी एसटी बस बंद पडली. त्यामुळे या पुलावर सहा तास वाहतूककोंडी झाल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला.

कल्याणच्या पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, या कामाला गती नाही. तर, शेजारील अरुंद पुलावर प्लास्टिकचे दुभाजक ठेवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता पुलावरून जाणारी एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे तेथेच बंद पडली. परिणामी, वाहतूककोंडीत आणखी भर पडली.एसटी बसचालक व वाहक यांनी बस बंद पडल्याची माहिती कल्याण एसटी डेपोला दिली. मात्र, सायंकाळी ५ वाजले तरी बंद पडलेली बस तेथून हलवलेली नव्हती. त्यामुळे बसचालक आणि वाहक हतबल झाले. शिवाय, वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनीही टोइंग व्हॅन मागवली नाही. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी त्यांच्या नावाने शंख केला. दरम्यान, एसटी बसमधील प्रवाशांनाही पत्रीपुलावरून कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागली.खड्डे आणि प्लास्टिकचे तुटलेले दुभाजकजुन्या पत्रीपुलाला समांतर असलेल्या पुलाच्या सुरुवातीला काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच प्लास्टिकचे दुभाजक बेशिस्त वाहनचालकांमुळे तुटले आहे. दुभाजकाची लेनही विस्कटली आहे.च्पुलावरील खड्डे भरणे, दुभाजक नव्याने लावणे, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. हद्दीचा मुद्दा न पाळता महापालिकेकडून खड्डे बुजवले जाणार होते. तसेच पुलावर मास्टिक अस्फाल्टिंग शीट टाकली जाणार होती. मात्र, ती टाकण्यात आलेली नाही.च्महापालिकेच्या मते राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास १ मे पासूनच सुरुवात केली आहे. मग, या पुलावरील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.