शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर-डहाणूत परिस्थिती सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:58 IST

प्रशासन सज्ज : चक्रीवादळाचा संभाव्य इशारा; निवारा केंद्रात पाठविलेले नागरिक घरी परतले

अनिरुद्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूत चक्रीवादळाचा संभाव्य धोका प्रशासनाकडून देण्यात आला असला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात पाठविण्यात आलेले किनारी भागातील नागरिक घराकडे परतले. दरम्यान, एनडीआरएफ टीम, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यासह तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

तालुक्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १ जूनपासून एक अधिकारी आणि २१ जवानांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या १३ गावांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या गावांमध्ये भेटी देऊन तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली. या वेळी त्या - त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दवंडी देत ज्या नागरिकांची कच्ची घरे आहेत, त्यांना नजीकच्या शाळांमध्ये तयार केलेल्या निवारा केंद्रांत जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी नरपड, आगर, पारनाका नजीकच्या सतीपाडा वस्तीतील नागरिकांना निवारा केंद्रांत हलविले.

बुधवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत वादळसदृश स्थिती होती. साडेबारा वाजल्यानंतर कमी वेगाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, सायंकाळी परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रांतील नागरिकांनी घर गाठले. वीजपुरवठाही अखंडित सुरू होता. डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गालगत धोकादायक वृक्ष छाटण्याचे काम वन विभागाने हाती घेतले होते. प्रशासनाचे अधिकारी किनाºयालगतच्या गावांमध्ये राहून परिस्थितीवर नजर ठेवून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून वाºयाचा वेगही सामान्य होता, असे ते म्हणाले.जिल्हा प्रशासनाला नगरपालिका क्षेत्रासह किनाºयालगतच्या १३ गावांची संभाव्य माहिती देण्यात आली होती. त्यांच्याकडून डहाणू, नरपड आणि चिखले या गावांना संभाव्य धोका सांगण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता डहाणू शहरातील सर्व दुकाने, कारखाने बंद करण्यात आले होते.आगरच्या दुबळापाडा या किनाºयालगत वस्तीतील कच्च्या घरांत राहणाºया शंभर नागरिकांना नजीकच्या बंगल्यात आणि वसतिगृहात हलविण्यात आले. मात्र परिस्थिती सामान्य असल्याने ते पुन्हा घराकडे परतले.- संजय पाटील/संदेश पाटील (निवारा केंद्रात मदत करणारे)तालुक्याला चक्रीवादळाचा संभाव्य इशारा देण्यात आला असला, तरी दिवसभर परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात गेलेले नागरिक घराकडे परतले असून दिवसभर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक हालचालींवर प्रशासनाचे लक्ष असून ते सज्ज आहेत.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू