शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेली बोट अखेर किनाऱ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:29 IST

११ जण सुखरूप परतले : उत्तनच्या मच्छीमारांनी मदत केल्याने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : वारा आणि उंच लाटांमुळे रविवारी पहाटे उत्तनच्या किनाºयापासून ३५ किलोमीटर खोल समुद्रात बुडालेली साई लक्ष्मी - ५ ही बोट मच्छीमारांच्या ५ बोटींनी मिळून मंगळवारी रात्री चौक किनाºयाजवळ आणली. बोटीच्या नाखवासह खलाशी मिळून ११ जण सुखरुप असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला असला तरी, बोटीचे मात्र काही लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.साटपाटीच्या अनिल काशिनाथ तांडेल यांची साई लक्ष्मी बोट ही भार्इंदर उत्तन - पातान बंदर येथील मच्छिमार विजय रिचर्ड बगाजी यांनी भाडेतत्वावर मच्छीमारीसाठी घेतली होती. शुक्रवारी विजय हे मच्छीमारीसाठी १० खलाशांना घेऊन समुद्रात गेले होते. एकदा जाळे टाकून मच्छीमारी केल्यानंतर सुमारे ३५ किमी खोल अंतरावर बोट थांबली होती. परंतु समुद्रात सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे मोठ्या लाटा उसळल्याने रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ही बोट उलटली.भर समुद्रात बोट उलटल्याने विजयसह दहा खलाशी समुद्रात पडले. मिट्ट काळोख आणि जोरदार लाटांमध्येही त्यांनी प्रसंगावधान राखून बोटीवर रिकामे झालेल्या पाण्याच्या ड्रमला धरुन तरंगत राहिले. विजय यांनी दूर दिसत असलेल्या मासेमारी बोटीचे दिवे पाहून, त्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. सुमारे एक ते दिड किमी पोहत जात तेथे असलेली उत्तन भागातील दया सागर ही मच्छिमार बोट त्यांनी गाठली. बोटीवरील नाखवा गिल्बर्ट नेतोघर यांना आपली बोट बुडाली असून १० खलाशी समुद्रात असल्याने त्यांना वाचवण्याची विनंती केली.गिल्बर्ट यांनी मच्छीमारीसाठी जाळी टाकण्याचे काम थांबवून तातडीने बोट बुडाली होती त्या दिशेला आपली बोट नेली. समुद्रात तरंगत असलेल्या खलाशांना बोटीवर घेऊन सर्वांचे जीव वाचवले. दयासागरसह आजुबाजुला असलेल्या यशस्वी, एंजल आदी बोटींनीदेखील मदतीसाठी धाव घेतली. नंतर ही माहिती विजय यांच्या घरी तसेच अन्य मच्छीमारांना देण्यात आली. बुडालेली बोट व त्यावरील ११ जणांना किनाºयावर आणण्यासाठी उत्तन भागातून मॉर्निंग स्टार, अनोख, डोर्मिशन, योसेफा, शास्त्रलेख या बोटी समुद्रात रवाना झाल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी बुडालेली बोट व त्यावरील नाखवा आणि खलाशांना घेऊन पाचही बोटी भार्इंदरच्या चौक येथील धक्क्याजवळ समुद्रात आल्या. उशिरापर्यंत ही बोट किनारी आणण्याचे प्रयत्न सुरु होते.