शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत स्वाइनचे ९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:50 IST

ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २५ जणांचा बळी गेला आहे. यातील तिघांचा मृत्यू हा जिल्ह्याबाहेर झाला आहे. तसेच स्वाइन फ्लूने बाधीत रूग्णांचा आकडा आतापर्यंत ५०७ वर गेला असून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत ४०८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ७६८ रुग्णांनी स्वाइनसंदर्भात तपासणी केली आहे. त्यातील ६०७ जण स्वाइन फ्लू संशयित म्हणून पुढे आले. या संशयितांपैकी ५०७ जणांना आतापर्यंत स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदाची बाब म्हणजे, यातील ३५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर अजूनही १३४ रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. मृतांचा आकडा २५आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात २५ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.कल्याणात ५९ बाधीत रुग्णजिल्ह्यातील विविध रुग्णालयात स्वाइन फ्लूचे १३४ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याणात ५९ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाण्यात-५७, नवी मुंबईत-१२, मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत ६ रुग्णांचा समावेश आहे.ठामपानंतर केडीएमसीत रुग्णजिल्ह्यात आतापर्यंत स्वाइनची लागण झालेले सर्वाधिक २८४ रुग्ण ठामपा हद्दीत आढळले आहेत. त्यानंतर केडीएमसीमध्ये १२४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्येही ६६ रुग्ण असून नवी मुंबईत २४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तसेच उल्हासनगरात एकाला त्याची बाधा झाली आहे. दरम्यान, स्वाइनचे प्रमाण वाढते असूनही यावरील लस मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे.तपासणीत नवी मुंबई आघाडीवर- १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लू संदर्भात १ लाख २५ हजार ७६८ जणांनी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नवी मुंबईत ७२ हजार ७०९ जणांनी तपासणी केली आहे. त्यानंतर ठाणे - ४०,५४५, उल्हासनगर-७,००६,मीरा-भार्इंदर- ३,६६९, कल्याण डोंबिवली-९२२ आणि भिवंडीत- ९१७ जणांनी फ्लूची तपासणी केली आहे.