शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन वालधुनी’त कारखान्यांच्या प्रदूषणावर मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:06 IST

ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर  : ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला. मिशन वालधुनी पार पडले. तसेच या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष निधी आणण्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.उल्हासनगरच्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच मिशन वालधुनी हा कार्यक्रम राबविण्यात आला. शहराच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त ६८ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सकाळी साडेसात वाजता उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते चांदीबाई महाविद्यालयादरम्यान वालधुनी नदीकिनारी जलपुरूष राजेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, महापौर मीना आयलानी, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा आदीसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. राजेंद्र सिंग यांनी नदीची पाहणी करून ती वाचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.या पदयात्रेनंतर सर्वांनी ऐतिहासिक कोनशिलेकडे मोर्चा वळविला आाणि तिला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नदी संवर्धनाबाबत दुपारी जलसंवाद झाला. त्यात राजेंद्र सिंग यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शन केले. वालधुनी बिरादरी व रोटरी क्लब यांनी ६८ प्रश्नांच्या प्रश्नावलीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार केला.