शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांविरोधात मूकमोर्चा; लहान मुलेही झाली सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:12 IST

आरजी जागेवरील बांधकामे हटवा : लोकप्रतिनिधींवर टीका

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीपार्कमधील आमच्या हक्काच्या आरजी जागेतील अतिक्र मणे तोडून जागा मोकळी करून द्या. बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे आमदार व स्थानिक नगरसेवकांनी बंद करावे, अशी मागणी करत रहिवाशांनी रविवारी सायंकाळी मूकमोर्चा काढला होता. यामध्ये लहान मुले, तसेच वृद्धही सहभागी झाले होते.

युनिक गार्डन येथून मूकमोर्चास सुरुवात झाली. आरजीच्या जागेत फिरून मग झेवियर्स शाळा ते गोकुळ व्हिलेज, शांतीपार्क, बँक आॅफ इंडिया येथून फिरून पुन्हा आरजीच्या जागेजवळ मूकमोर्चाचा समारोप झाला. यावेळी मीरा रोड पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

शांतिपार्कच्या गोकुळ व्हिलेजमधील १२ इमारतींलगतच्या आरजी जागेमध्ये भले मोठे प्रवेशद्वार, मोठे शेड तसेच मोठी बांधकामे बेकायदा बांधलेली आहेत. ही बांधकामे पालिकेने बेकायदा ठरवूनही तोडक कारवाई केलेली नाही. तर रहिवाशांच्या सततचा पाठपुरावा आणि आंदोलनांमुळे आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही बेकायदा बांधकाम तोडण्याचे पत्र दिले होते. पण, ते केवळ कागदी घोडेच ठरले असून स्थानिक आमदार आणि नगरसेवक या बांधकामांना संरक्षण देत असल्याने त्यांचाही निषेध रहिवाशांनी केला.त्यांच्या हातात फलक होते. आमदार व स्थानिक नगरसेवकांनो आमच्या आरजी जागेतील बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे बंद करा, असे फलकांवर लिहिले होते. आरजी जागा मोकळी करून उद्यान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा रहिवाशांना दिला आहे. दरम्यान, शनिवारच्या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याचे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कारवाईलाही टाळाटाळ होण्याची शक्यता आहे.