शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-समितीत संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: October 6, 2016 02:39 IST

सरकारने एका बाजूला वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला असला तरी दुसऱ्या बाजुला डहाणू च्या पश्चिम किनारपट्टी वरील २५ ते ३० गावातील हजारो मच्छीमार

शौकत शेख, डहाणूसरकारने एका बाजूला वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला असला तरी दुसऱ्या बाजुला डहाणू च्या पश्चिम किनारपट्टी वरील २५ ते ३० गावातील हजारो मच्छीमार ,शेतकरी ,बागायतदार ,डायमेकर्स यांना उध्वस्त करणार्या या बंदराच्या सर्व्हेला विरोध करण्यासाठी परिसरातील हजारो लोक आक्रमक झाल्याने ,वाढवण बंदर संघर्ष समिती आणि सरकार यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने नेमलेल्या दोन कंपन्यांना बंदराच्या सर्व्हेचे काम सुरळीत पार पाडता यावे म्हणून संरक्षण देण्यासाठी डहाणू उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात संघर्ष समिती समवेत बैठक बोलावली होती. तिला डहाणू उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर , तहसीलदार प्रतीलता कौरथी माने , वाणगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, बंदर अधिकारी जाधव, चिंचणी मंडळ निरीक्षक राठोड , वाढवण बंदर संघर्ष समितीचे नारायण पाटील , अशोक अंभिरे , वैभव वझे , बारी, हरेश्वर पाटील, अशोक पाटील , कृपानंद पाटील, संतोष राउत ,तानाजी वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलतांना प्रशाली दिघावकर यांनी वाढवण बंदराच्या सर्व्हेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समितीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.सर्व्हे पूर्ण झाल्या शिवाय बंदर उभारणीचे खरे चित्र स्पष्ट होणार नसल्याचे सांगितले. याच कामावर विकास आराखडा अवलंबून असून तो तयार झाल्यानंतर वाढवण येथे बंदर उभारणे शक्य आहे की नाही हे पर्यावरण विषयक आणि कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या नंतरच ठरविले जाणार आहे . त्यामुळे बंदर समितीने सर्व्हेच्या कामात अडथला आणून कायदा हातात घेऊ नये असे त्यांनी आवाहन केले. या वर समितीने आपले म्हणणे मांडतांना या बंदरामुळे मच्छीमारी आणि शेती कशी उध्वस्त होणार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.