शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात कारवाई न झाल्यास शटर डाउन आंदोलन

By admin | Updated: January 10, 2017 06:19 IST

रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याने सोमवारी स्टेशन परिसरातील

ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याने सोमवारी स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून पालिकेच्या कुचकामी कारवाईचा निषेध केला. या वेळी पालिका आयुक्तांनी स्वत: येथील पाहणी करण्याचे आणि कारवाईचे आश्वासन दिले. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची या वेळी भेट घेतली असता कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या आठवडाभरात स्टेशन परिसरातील फेरीवाले हटले नाहीत तर राममारुती रोड, नौपाडा, स्टेशन आणि जांभळीनाका भागांतील तब्बल १२०० व्यापारी पुढील आठवड्यात शटर डाउन आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.महापालिकेने स्टेशन परिसरातील अरुंद रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली. यासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकानेदेखील तोडण्यास परवानगी दिली. परंतु, त्यानंतर आता या रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेने या भागात टीमदेखील तैनात केली आहे. परंतु, असे असताना त्यांचे बस्तान वाढल्याचा आरोप सोमवारी व्यापाऱ्यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही केवळ कारवाईचा फार्स केला जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे स्टेशन परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला असतानादेखील या भागात त्यांचे प्रस्थ वाढत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी कारवाई करण्यासाठी येते. परंतु, या कारवाईची भणक व्हॉट्सअ‍ॅपवर मिळताच फेरीवाले पळ काढतात. त्यामुळेच, ही कारवाई अधिक तीव्र व्हावी, ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून या परिसराकडे पाहिले जावे, वाहनांची येजा करण्यासाठी हा रस्ता मोकळा असावा, अशा विविध मागण्या व्यापाऱ्यांनीच केल्या आहेत. दरम्यान, या वेळी त्यांनी सुरुवातीला आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर, गेटवरच त्यांना अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर, त्यांनी पोलीस आयुक्तांचीदेखील भेट घेतली. या वेळी पोलीस आयुक्तांनी फेरीवाल्यांवरील कारवाईची जबाबदारी ही पालिकेचे असल्याचे सांगितले. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मदतीला असतीलच, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)