शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुभाव टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुभाव टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ एप्रिलच्या सुधारित आदेशानुसार शनिवार व रविवारी फेरीवाल्यांना व्यवसायास मनाई केली आहे. त्यानुसार शनिवारी फेरीवाले बसू नयेत, यासाठी पूर्वेतील ‘ग’ व ‘फ’ आणि पश्चिमेतील ‘ह’ प्रभागांत केडीएमसीने सकाळी ७ वाजल्यापासून भरारी पथके तैनात केली होती. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि फडके रोड, चिमणी गल्लीतील भाजीमार्केट परिसरात शुकशुकाट होता. मात्र, काही भागांत फेरीवाले सकाळी तसेच सायंकाळी बसलेले आढळून आले.

आयुक्तांनी होळीच्या अगोदर काढलेल्या आदेशानुसार फेरीवाले आणि दुकानदारांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास मनाई केली होती. मात्र, होळीच्या आदल्या दिवशी दुकानदारांनी डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाबाहेर आयुक्तांच्या आदेशाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांना आपला निर्णय बदलावा लागला होता. त्यामुळे दुकानदारांना शनिवार व रविवारी व्यवसाय करण्यास मुभा, मग आमच्या बाबतीत दुजाभाव का, अशी संतप्त प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे. मनपा प्रशासनाने निर्णय न बदलल्यास फेरीवाल्यांच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता फेरीवाले बसू नयेत, यासाठी मनपाने सकाळीच भरारी पथके तैनात केली होती. त्याची धास्ती घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय करणे टाळले. मात्र, काहींनी बसण्याचा प्रयत्न केला असता मनपाच्या पथकांनी त्यांना कारवाईची तंबी दिली. त्यामुळे फेरीवाल्यांनीही काढता पाय घेतला.

‘ग’ प्रभागात रमाकांत जोशी यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी रामनगर, एस. व्ही. पथ, शिवमंदिर रोड, पाटकर रोड, डॉ. राथ रस्ता, उर्सेकरवाडी तर, पश्चिमेत ‘ह’ प्रभागात बाजीराव आहेर यांनी दीनदयाळ, घनश्याम गुप्ते रोड, महात्मा फुले रोड आणि सुभाष रोड येथे कर्मचारी तैनात केले होते. ‘फ’ प्रभागात फडके रोड, मानपाडा रोड, टाटा पॉवर लेन, स्काय वॉक आदी ठिकाणी फेरोवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. दुसरीकडे नागरिकांनी ११ वाजल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात येण्याचे टाळल्याने तेथे गर्दी आटोक्यात असल्याचे निदर्शनास आले.

काही भागांत मात्र फेरीवाल्यांचे बस्तान

- पूर्वेत गोग्रासवाडी, मानपाडा रोड, सुनीलनगर, दत्तानगर, नेहरू मैदान, ठाकुर्ली येथे भाजीपाला व फळविक्रेते व्यवसाय करताना आढळले. सायंकाळच्या वेळी फडके रोड, छेडा रोडे येथे फेरीवाले, हातगाडीवाले व्यवसाय करत होते.

- पश्चिमेत गुप्ते रोड, नवापडा, उमेशनगर येथेही काही प्रमाणात फेरीवाले, रस्त्यावर चीजवस्तू विक्री करणारे आढळून आले. मात्र, कारवाईच्या भीतीने पथारी आवरून सावधगिरी बाळगून काहींनी छुप्या पद्धतीने मालाची विक्री केली.

तर, काही ठिकाणी मनपाच्या पथकाची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आयुक्तांनी दुकानदारांना शनिवार, रविवारी व्यवसाय करण्यास मुभा दिल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण होते.

-----------