शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत यांचे मताधिक्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:03 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघ : तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी

कल्याण : लोकसभा कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे यंदा तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी झाले. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दोन लाख ५० हजार ७४९ मताधिक्य मिळाले होते. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदाचे मताधिक्य ९३ हजार ५९४ मतांनी वाढले आहे.

कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत सेनेचे शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात रंगली. शिंदे यांनी पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. शिंदे यांना पाच लाख ५९ हजार ७२३ मते (६२.९ टक्के) मिळाली आहेत, तर पाटील यांना दोन लाख १५ हजार ३८० मते (२४.२ टक्के) मिळाली.

तिसºया क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना मिळाली. प्रथमच निवडणूक लढवणाºया वंचित आघाडीने ६५ हजार ५७२ मतांपर्यंत मजल मारली. त्यांना एकूण मतांपैकी ७.४ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव निकालावर पडला नसल्याचे पाहायला मिळते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे हे नवखे होते. त्यावेळी त्यांना चार लाख ४० हजार ८९२ मते मिळाली होती. तर, त्यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी एक लाख ९० हजार १४३ मते पटकावली होती. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादीला २५ हजार २३७ मते अधिक मिळाली आहेत.

दरम्यान, मागील वेळेस टपालाद्वारे एकूण ५९८ मते मिळाली होती. त्यापैकी शिंदे यांना ३१८, तर आनंद परांजपे यांना १३७ टपालाद्वारे मते मिळाली होती. यंदा श्रीकांत शिंदे यांना १७०० टपाली मते, तर बाबाजी पाटील यांना ३६६ टपाली मते मिळाली आहेत.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचेच प्राबल्यराष्ट्रवादीचा बालेकि ल्ला असलेल्या मुंब्रा-कळव्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली आहेत. तर, सेनेच्या शिंदेंना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीला नऊ हजार ८८१ चे मताधिक्य मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांनाही येथे पाच हजार २१० इतकी मते मिळाली आहेत.‘नोटा’ चिंतेची बाब२०१४ मध्ये नोटा मतांची संख्या नऊ हजार १८५ इतकी होती. यंदा मात्र ही संख्या १३ हजार १२ पर्यंत गेली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या तीन हजार ८२७ ने वाढली आहे. ही राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.कल्याण ग्रामीणमध्ये सेनेची बाजी२०१४ च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना १२ हजार २५६ मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, यंदाचे उमेदवार पाटील यांनी भूमिपुत्र म्हणून आगरीकार्डचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्यामुळे त्यांना कल्याण ग्रामीणमधून भरभरून मते मिळतील, असा अंदाज होता. परंतु, तो फोल ठरला आहे. तेथे त्यांना ४३ हजार ८६९ मते मिळाली, तर सेनेच्या शिंदेंनी येथून एक लाख २६ हजार ६०७ मते पटकावली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कल्याण ग्रामीणमध्येच सर्वाधिक मते शिंदे यांना मिळाली आहेत.