शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात श्रावण सरी बरसल्या, बारवी धरणात १५६ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 01:07 IST

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात १५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली.

ठाणे : जिल्ह्यात चार दिवसांपासून संततधार सुरु असून शनिवारीही अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरींचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. ध्वजारोहण सोहळ््याच्या वेळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ठाणे शहर परिसरात ७६ मि.मी. पाऊस झाला. या तुलनेत जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात १५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली.जिल्ह्यातील शहरांना, एमआयडीसीला, गांवपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात व परिसरात २४ तासात सरासरी ११९ मि.मी. पाऊस पडला. यापैकी बारवी धरणात १५६ मि.मी., खानिवरे १६८ मि.मी., कान्होळ ११७ मि.मी., पाटगांव ८१ मि.मी. आणि ठाकूरवाडी ११० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली. बारवी धरणाची पाणी पातळी ६८.२८ मीटर झाली असून या धरणात अजून ४.३२ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. त्यानंतर या धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील. धरणातील आजचा पाणीसाठा ६६.६६ टक्के असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ९९.६५ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. धरण भरण्याच्या आधीच पिंपळोली, चांदप, दहागांव, चोन, अस्नोली राहटोली, सागांव पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चांदपपाडा आदी बारवी नदी काठावरील गांवाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.