शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीने घातले ठामपाचे श्राद्ध

By अजित मांडके | Updated: October 2, 2023 14:02 IST

ठाणे : ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. ...

ठाणे : ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर तोडगा काढला जात नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून सोमवारी दिव्यांगांनी ठामपाचे श्राद्ध घातले. 

भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष  आनंद जयराम  बनकर , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत - दिव्यांग शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष  मुकेश म. घोरपडे , बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना (रजि) संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक  मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान,  प्रहार अपंग ( दिव्यांग  ) क्रांती संस्था (रजि.)चे  ठाणे जिल्हाध्यक्ष - मंगेश मदन साळवी आणि सशक्तिकरण महीला बचत गटाच्या अध्यक्षा शबनम रैन , नितीन जगदाळे , नारायण पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाणे महानगर पालिकेकडून या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टाॅल देण्यात आले आहेत.  मात्र, हे स्टाॅल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टाॅल ठेवण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळेच दिव्यांग सक्षमीकरण योजनेस खिळ बसत आहे. मात्र, चुकीच्या ठिकाणी स्टाॅल असल्याने कमाई कमी खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या स्टाॅल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा, अशा ठिकाणी स्टाॅल द्यावेत, किंवा त्यांच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी,  अशी संघटनेची मागणी आहे.  मात्र, पालिका अधिकारी नगरसेवकांची महासभा होत नसल्याने पत्ता बदल करणेस टाळाटाळ करीत आहेत.

वास्तविक पाहता, ठाणे पालिकेतील अधिकारी दरमहा महासभा भरवून धोरणात्मक निर्णय घेत आहेत. तरीही केवळ दिव्यांगांच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जात आहे. त्यामुळेच येत्या  दोन ऑक्टोबरला ठामपा मुख्यालयासमोर केशवपन करून ठामपाचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळेस  6 दिव्यांगांनी पितृपक्षात केशवपन केले. तसेच याच ठिकाणी ठामपाच्या नावाने अन्नदान केले. उद्या,  तीन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, समितीने सांगितले.

दरम्यान, यावेळी मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूख खान यांनी सांगितले की, दिव्यांगांना व्यवसायासाठी दिलेली जागा बदलून देण्यात यावी, दिव्यांग सक्षमीकरणीकरणासाठी एकरक्कमी पाच लाख रूपये देण्यात यावेत, 80 ते 100 %, अस्थिव्यंग, गतिमंद दिव्यांगांना 5000 रूपये पेन्शन देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ आश्वासने देण्यात आली होती. त्याची पूर्तता करण्यात येत नसल्यानेच आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जो पर्यंत आम्हांस लेखी आश्वासन दिले जात नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात येईल.

टॅग्स :thaneठाणे