शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीतील दुकाने आज व उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने उद्या शनिवार व रविवारी दोन दिवस महापालिका हद्दीतील ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने उद्या शनिवार व रविवारी दोन दिवस महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांची वाटचाल काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.

शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही शनिवारी, रविवारी पूर्णपणे मज्जाव केला आहे. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल, बारला काउंटरवर पार्सल सेवा देता येणार आहे. डी मार्ट आणि मॉल्सदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवेत भाजीपाला, औषधे, दूध, अन्नधान्य यांची दुकाने सुरू राहतील. याखेरीज, अन्य दुकाने बंद राहणार आहेत. पुढील दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद राहतील. दरआठवड्याच्या अखेरीस शनिवार-रविवारी याच पद्धतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेले काही दिवस शनिवार-रविवारी डोंबिवली, कल्याण शहरातील बाजारपेठांत तुफान गर्दी असते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे ही उपाययोजना केली जाणार आहे. आठवड्यातील केवळ दोन दिवस दुकाने बंद करून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाऊन अपरिहार्य असेल, असे बोलले जाते. होळी साजरी करण्यावर महापालिकेने अगोदरच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणी सोसायटीच्या आवारात होळी अथवा धूळवड साजरी करताना दिसले तर त्यांच्यावर देखरेख ठेवून कारवाई करण्याकरिता चार पथकांची नेमणूक महापालिका प्रशासनाने केली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट केले.

.........

वाचली