शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सोशल डिस्टेसींग नियमाचे पालन न झाल्यास दुकानादारांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:12 IST

भाजी मंडईची गर्दी कमी होत नसतांना आता जांभळी नाका येथील होलसेल मार्केटमध्ये देखील नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता दुकानदारांनी सोशल डिस्टेसींगचे पालन न केल्यास अशा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी ताकीद पालिकेने दिली आहे.

ठाणे : ठाण्यातील भाजी मंडईनंतर खारकर आळी आणि जांभळी नाका परिसरात असलेल्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या होलसेल मार्केटमध्ये देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या ठिकाणीही सोशल डिस्टेसींगचे नियम नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवले आहेत. शुक्र वारी या मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यानंतर आता यासंदर्भात प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून सोशल डिस्टेसींगची जबाबदारी संबंधित होलसेल दुकादारांवर टाकण्यात आली आहे. तशाप्रकारच्या नोटिस येथील १०० दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सोशल डीस्टनिसंगच पालन करावे यासाठी होलसेल दुकानदारांनीच स्वयंसेवक नेमावे अन्यथा साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वेळ पडल्यास संबधींत दुकानदारांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले जातील असा इशाराही पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.                        वारंवार सूचना करूनही ठाण्यातील भाजी मधील गर्दी एकीकडे कमी होत नसताना दुसरीकडे अन्नधान्य मार्केटमध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. प्रशासनाच्या वतीने कळवा, मुंब्रा आणि दिवा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले असले तरी, ठाण्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यासाठी सवलत दिली आहे. त्यामुळे ही दुकाने सुरु राहणार असली तरी नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसून भाजी मंडईप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र खारकर आळी परिसरात असलेल्या होलसेलच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. ठाण्यातील हे सर्वात जुने मार्केट असून या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहरातून नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. मालाची डिलेव्हरी करण्यासाठी देखील या ठिकाणी मोठे ट्रक येत असल्याने या मार्केटमध्ये अक्षरश: नागरिकांना चालणे देखील कठीण होते. शुक्र वारी सकाळी देखील नागरिकांनी अशाच प्रकारे या ठिकाणी गर्दी केली होती.                      या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर संपूर्ण मार्केटची पाहणी पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून नागरिकांनी दुकानांचा बाहेर अक्षरश: गर्दी केल्याचे उघड झाले असून दुकानदारांकडून देखील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता येथील १०० दुकादारांना नोटीस पाठवण्यात आल्या असल्याची माहिती नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी दिली आहे. यामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यासाठी प्रत्येक होलसेल दुकानदाराने स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जे दुकानदार या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन, तीन दिवसात यात सुधारणा झाली नाही तर संबधींत दुकानादारांच्या विरोधीत गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMarketबाजार