शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:49 IST

दारुच्या व्यसनाधीनतेमुळे आलेल्या नैराश्येमुळे ठाण्यात मोहमद सादिक शेख या प्रादेशिक परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाने स्वत:वर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलघटनास्थळावरुन रिव्हॉल्व्हर हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील कॅसलमिल भागात प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी मोहंमद सादिक शेख (६८) यांनी स्वत:च्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्र वारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दारूचे व्यसन असलेल्या शेख यांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता राबोडी पोलिसांनी वर्तविली आहे.कॅसलमिल येथील विकास कॉम्प्लेक्समध्ये राहणारे शेख हे त्यांच्या ४५ वर्षीय अभियंता मुलासोबत वास्तव्याला होते. शुक्र वारी दुपारी मुलगा घरात झोपलेला होता. त्याचवेळी त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याला हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेख यांची पत्नी त्यांच्यापासून गेल्या वर्षभरापासून वेगळी नेरळ येथे वास्तव्याला आहे. त्यांची एक मुलगी अभियंता तर दुसरी डॉक्टर आहे. दोन्ही मुली विवाहित असून अविवाहित अभियंता मुलगा त्यांच्यासमवेत होता. व्यसनाधीनतेतून आलेल्या नैराश्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांनी त्यांची रिव्हॉल्व्हरही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या