शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात भावजयीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भावाचा खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार दीराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:23 IST

घराचा ताबा मागणाºया भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाºया अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करुन खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मोठया शिताफीने अटक केली. या धक्कादायक घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे भावजयीवरही केला चाकूने हल्ला पोलिसांनी वाचविले महिलेसह आरोपीचेही प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घराचा ताबा मागणाºया भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाºया अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करुन खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मोठया शिताफीने अटक केली. त्याचवेळी खूनी हल्ला झालेल्या नीता कर्डक हिला तातडीने रुग्णालयात दाखल करुन तिचेही प्राण वाचविले आहे.ठाणे शहर पोलीस दलातील हवालदार राजन कर्डक यांचा २०१८ मृत्यु झाला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्याच्या घराचा ताबा हा त्यांचा भाऊ निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक यांच्याकडे होता. पतीच्या निधनानंतर गेली अनेक दिवस आपल्या घराचा ताबा मिळविण्यासाठी नीता या दीर महेंद्र यांच्याकडे पाठपुरावा करीत होत्या. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्या किसननगर येथील विजय सदन येथील महेंद्र यांच्याकडून आपल्या घराचा ताबा घेण्यासाठी पुन्हा चुलत दीर अजय कर्डक (२८) आणि अन्य एक नातेवाईक शंकर मालविया यांच्यासह गेल्या. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यातूनच महेंद्र याने घरातील सुरीने नीताच्या गळयावर वार केले. त्याच दरम्यान श्रीनगर पोलिसांना या भांडणाची माहिती मिळाली. हा हल्ला झाल्यानंतर बिट मार्शल मुंकूंद राठोड आणि सुनिल धोंडे तिथे पोहचले. त्यावेळी रक्तबंभाळ अवस्थेमध्ये तिथून बाहेर पडलेल्या नीता यांच्या गळयाला ओढणीने बांधून राठोड यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. तर धोंडे यांनी हल्लेखोराचा शोध घेतला. तोपर्यंत त्याने या भांडणात मध्यस्थी करणाºया अजय यांच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर तो स्वत:वर वार करण्याची धमकी देत होता. अजय हा देखिल रक्ताच्या थारोळयात पडला होता. धोंडे यांनी स्वत:चे कौशल्य वापरून महेंद्रच्या हातातील चाकू काढला. नंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात नेले. जखमी अजयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राठोड आणि धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या महिलेचे प्राण वाचविले. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाºया आरोपीलाही अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनArrestअटक