शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चक्क कलानींच्या हस्ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:53 IST

सत्तेसाठी काय पण : निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कलानीराजविरोधात उभा ठाकणारा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी खुद्द ओमी कलानी यांच्याच हस्ते झाल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकेकाळी ज्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नव्हती, त्या कलानींसोबत केवळ सत्तेसाठी केलेल्या हातमिळवणीवर टीका होत आहे.उल्हासनगरातील बहुसंख्य सिंधी मते एकगठ्ठा युतीच्या उमेदवाराला मिळण्यासाठी विचारधारा बाजूला ठेवून शिवसेनेने ओमी कलानी यांच्याकडे मदतीचा हात मागितला. राज्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरण बघता ओमी कलानी यांनी युतीला सशर्त साथ दिली. वास्तविक, शिवसेना म्हणजे कलानीराजविरोधात दंड थोपटून उभा राहणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख आहे. महापालिका निवडणुकीवेळी भाजप नेत्यांच्या रांगेत पप्पू कलानी यांचा फोटो लागल्याने, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. आता तर ओमी कलानी यांच्याच हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेत भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपने परंपरागत मित्रपक्ष शिवसेनेला दूर सारून ओमी टीमसोबत आघाडी केली होती. त्यावेळी ओमी टीमचे सर्व उमेदवार भाजपच्या तिकिटावर उभे राहिले आणि कधी नव्हे ते ओमी टीमच्या मदतीने भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले; मात्र त्यांना बहुमत गाठता आले नाही. त्यानंतर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घालून सत्तेसाठी होकार मिळवला. त्यानंतर, भाजप-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता महापालिकेवर आली. महापौरपदाचा मान भाजपच्या मीना आयलानी यांना मिळाला, तर सव्वा वर्षाने ओमी टीमच्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले.शहरात विरोधी पक्षच नाही - श्रीकांत शिंदेमहापालिकेत २५ नगरसेवक निवडून आलेली शिवसेना विरोधी पक्षात बसली; मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते गळ्यात-गळे घालून फिरू लागले. भाजपसोबत पालिकेत सत्तेत असलेल्या ओमी कलानी यांनाही युतीच्या बाजूला करण्यात शिवसेना यशस्वी झाली. त्यानंतर, बुधवारी मराठा सेक्शन येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ओमी कलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी शहरात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे प्रतिपादन युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी केले.