शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शिवाई विद्यालय : ‘लर्न विथ नेचर’चा विद्यार्थ्यांना लळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 03:56 IST

पहिलीपासूनच इंग्रजीचे धडे देणे, शैक्षणिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन याचबरोबर लर्न विथ नेचरसारखे विविध उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील शिवाई विद्यालयाच्या पटसंख्येबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सातत्याने उंचावतो आहे.

- स्नेहा पावसकरठाणे : पहिलीपासूनच इंग्रजीचे धडे देणे, शैक्षणिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन याचबरोबर लर्न विथ नेचरसारखे विविध उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील शिवाई विद्यालयाच्या पटसंख्येबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सातत्याने उंचावतो आहे.शिवाईनगर परिसरातील शिवाई विद्यालयाची स्थापना सन १९९६ मध्ये सुधाकर चव्हाण यांनी केली. शाळेत शिशुपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग आहेत. तर, इंग्रजी भाषा बोलणे, लिहिणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शाळेत पहिली इयत्तेपासूनच सेमी इंग्रजीमधून शिकवले जाते. गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिकवले जातात. यासाठी विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती केली जात नाही. उलट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज घेऊन त्यांना सेमी इंग्रजीत प्रवेश दिला जातो. शाळेत मुलांसाठी ई-ग्रंथालय असून त्यांच्या इयत्तेनुसार त्यांना पुस्तके उपलब्ध केलेली आहेत. तसेच ग्रंथालयात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या लेखक, साहित्यिकांचे कॅरिकेचर करून त्यांची माहिती असलेले पोस्टर शाळेच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. वर्गातील तसेच शाळेच्या आवारातील भिंतींवर या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून चित्रे काढण्यात आली असून भिंती बोलक्या आहेत. विज्ञान प्रयोगशाळेप्रमाणेच गणिताची प्रयोगशाळा आहे. या माध्यमातून गणित सोपे करून सांगितले जाते. जवळच्या आदिवासीपाडे, गावातील काही मुले पाचवी किंवा आठवी इयत्तेपासून शिवाई विद्यालयात प्रवेश घेतात. अशा मुलांना खाजगी शिकवणीची फी परवडत नाही. मात्र, त्या मुलांनाही उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळेतर्फे त्यांचे मोफत शिकवणीवर्ग घेतले जातात. शाळा सुटल्यावर किंवा भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली जाते.स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध परीक्षा यासारख्या परीक्षांना बसण्याची संधी देऊन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. शाळेच्या वतीने लर्न विथ नेचर हा आगळावेगळा उपक्रम आयोजिला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना भोवतालच्या जगाचेही ज्ञान व्हावे, या उद्देशाने त्यांना येऊर येथे नेले जाते. तिथे शेती, निसर्गात होणारे बदल, पक्षी, फुले, लोकजीवन यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अध्यक्ष विलास सूर्यवंशी आणि संस्था शाळेत नवनवीन प्रयोग राबवण्यासाठी आग्रही असतात, अशी माहिती शिवाई विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रचना वेखंडे यांनी दिली.अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड आर्थिक समस्या येत असल्यास त्यावर तोडगा काढला जातो, असे वेखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या