मीरा रोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये विविध कार्यक्रम झाले. दरम्यान, अंबाडी, शहापूर येथेही शिवजयंती उत्साहात साजरी झाली. रामदेव पार्क येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती चौक व ध्वजस्तंभ उभारण्यात आला. वक्तृत्व स्पर्धा व महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करण्यात आले. शांतिसागर चव्हाण, गणेश वाडिले, वासुदेव सावंत, विक्रम लोढे, प्रवीण उत्तेकर, मारुती शिंदे यांच्यातर्फे कार्यक्रम झाला. महापौर गीता जैन, सुरेश दळवी, स्नेहल सावंत, मनोज जगताप, सुहास सावंत, सतीश साटम आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने जनतानगर येथील कार्यालयात ब्लॉक अध्यक्ष केसरीनाथ म्हात्रे, सचिन म्हात्रे यांनी महाराजांना आदरांजली वाहिली. आदर्श शाळेत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. घोडबंदरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी घोडबंदर किल्ल्यापर्यंत मिरवणूक काढली. मुख्याध्यापक जयवंत वैती, नीता किणी हे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदरमध्ये शिवजयंती उत्साहात
By admin | Updated: February 20, 2017 05:44 IST