शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा; विविध मच्छीमार संघटनांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:26 IST

आराखड्यात तांत्रिक चुका असल्याचा आरोप

पालघर : प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मच्छीमारी करणारी गावे, त्यांची घरे आदी दर्शविण्याबाबत तांत्रिक चुका असतानाही हा आराखडा मच्छीमारांच्या माथी मारला जात आहे. यामुळे ३० सप्टेंबरच्या जनसुनावणीला मच्छीमार संघटनांनी विरोध दर्शविला असून या मागणीला शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने या लढ्याची ताकद वाढली आहे.

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मासेमारी गावे, मासेमारी संबंधित प्रत्येक उपक्रम, मच्छीमारांची घरे तसेच नकाशावरील सर्व सीमांकने, वर्गीकरण दर्शविण्यात आलेली नाहीत. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आणि मच्छीमारांसाठी घातक आहे. याबाबत मच्छीमारांच्या तक्रार निवेदनांचा कोणताही विचार न करता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपीएस) विषयाबाबतची जनसुनावणी बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी आॅनलाइनद्वारे आयोजित केली आहे.याबाबत नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, पालघर-ठाणे जिल्हा

मच्छीमार समाज संघ, पालघर व वाढवण बंदरविरोधी संघर्ष

समिती यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या सभेत आॅनलाइनद्वारे घेण्यात येणाºया जनसुनावणीस तीव्र विरोध दर्शविला आहे.ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, नॅशनल

फिश वर्कर्स फोरमच्या सेक्रेटरीज्योती मेहेर, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे सहसचिव वैभववझे, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे उपाध्यक्ष वैभव भोईर,प्रशांत नाईक, सहसचिव जयवंत तांडेल, सदस्य माणेंद्र आरेकर, जगदीश नाईक, भारत देव, शिवनाथ मेर,मुक्ता देव यांनी जिल्हाधिकारीडॉ. माणिक गुरसूळ यांना निवेदन देत जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.

मच्छीमारांना बसणार फटका

शिवसेनेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, तालुकाध्यक्ष विकास मोरे, निलेश राऊत आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असताना जनसुनावणी घेऊ नये तसेच पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने नेहमीच विद्युतपुरवठा खंडित होत इंटरनेटची सेवाही सुरळीत नसते. प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केल्याचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरfishermanमच्छीमार