शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सहकार्याचा ‘कोट’ पडणार महागात?

By admin | Updated: July 4, 2017 06:36 IST

स्वत:च्या पक्षाचे सूचक व अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : स्वत:च्या पक्षाचे सूचक व अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे मनसेच्या सुनंदा कोट यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या नेत्यांना आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या कोट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी दिली. आता यावर कोट काय खुलासा करतात आणि पक्ष त्यावर कोणता निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे. केडीएमसीच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. या समितीवर महिला उमेदवारांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दहाही जणींची समित्यांवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. याची अधिकृत घोषणा बुधवारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी होईल. मात्र, ‘अ’ प्रभाग समितीवर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रभागात अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी पुरेसे सूचक व अनुमोदक नसताना कोट यांनी शिवसेनेच्या सहकार्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे गणेश कोट आणि हर्षाली थवील त्यांना यांचे सूचक आणि अनुमोदन लाभले आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोट यांनी त्यांच्या मनसेला अंधारात ठेवले आहे. महापालिकेतील मनसेचे पदाधिकारी असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि गटनेते भोईर यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. गटनेते भोईर यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी केली असता त्यांनाही कोट यांनी कल्पना दिली नसल्याचे समोर आले आहे.बोलण्यास नकारअखेर, पक्षाने कोट यांना रितसर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार नोटीस बजावण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. यासंदर्भात कोट यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.