शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना करणार भाजपाची कोंडी

By admin | Updated: April 20, 2017 04:07 IST

महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा-ओमी टीम आणि साई पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिली महासभा गुरूवारी होत असून सत्तेपासून दूर राहिलेली शिवसेना

उल्हासनगर : महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा-ओमी टीम आणि साई पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिली महासभा गुरूवारी होत असून सत्तेपासून दूर राहिलेली शिवसेना त्यात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. पाणीटंचाई, कब्रस्तान, ग्राउंड, एमएसईबीच्या भूखंडावरून भाजपाला कोंडीत पकडण्याची तयारी त्यांनी केल्याने महासभा वादळी ठरेल, असे संकेत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले.उल्हासनगरात आठवड्याला दोन ते तीन दिवस तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. झोपड्यांतील रहिवाशांना या टंचाईची सर्वाधिक झळ बसते आहे. प्रदूषित असूनही झोपडपट्टीतील नागरिक हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक झोपडपट्टी असलेल्या परिसरातून निवडून आल्याने त्यांनी हा प्रश्न हाती घेत गेल्या आठवड्यात जिजामाता गार्डनसमोर उपोषण केले होते. आयुक्त सुधाकर शिंदे आणि महापौर मीना आयलानी यांच्या भेटीनंतर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र हा प्रश्न अजूनही न सुटल्याचा, परिस्थिती आणखी बिघडल्याचा आरोप नगरसेवक सुनील सुर्वे, अरूण आशान, सुरेंद्र सावंत, शेखर यादव, मितिली चान्पुर, लिलाबाई आशान यांनी केला. महासभेत पाणीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारून पाणी पुरवठ्याबाबत कृती आराखडा मागणार असल्याचे राजेंंद्र चौधरी यांनी सांगितले. तसेच व्हिटीसी मैदान, कब्रस्थानाचे हस्तांतर, वीज मंडळाला दिलेल्या भूखंडाचे हस्तांतर, अर्धवट कामे याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)