शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवसैनिकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:42 IST

शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे.

ठाणे : शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. विजय संकल्प मेळाव्यानिमित्त ते अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसह युवकांच्या भेटीगाठीही घेत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांच्यामागे अनेक कार्यकर्ते मात्र विनाहेल्मेट तसेच सिटबेल्ट न लावताच पोलिसांच्या साक्षीने वाहने हाकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच शिवसेना आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांच्या यात्रा राज्यभर धुराळा उडवत आहेत. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा पालघरमधील नालासोपारा येथून ठाण्यात मंगळवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. त्यावेळी आदित्य यांनी उपस्थितांना अभिवादन करीत ओवळा, मानपाडा येथून मार्गक्रमण केले. खोपट, टेंभी नाकामार्गे एनकेटी सभागृह येथे यात्रेचा मंगळवारी समारोप झाला. मानपाडा भागातून घोडबंदर रोडने जनआशीर्वाद यात्रेची बस मार्गक्रमण करीत असताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. ही वाहतूककोंडी नियंत्रणात आणताना पोलिसांचीही मोठ्या प्रमाणात कसरत झाली. त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे मोटारसायकलने भरधाव जात होते. यातील अनेक जण तर सर्रास ट्रिपल सिटही होते. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी हेल्मेटचाही वापर केलेला नव्हता. आश्चर्य म्हणजे या यात्रेच्या मागे कारमधून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही सीटबेल्टचा वापर केलेला नव्हता. वाहतूक पोलिसांचा बहुतांश वेळ वाहतूक सुरळीत करण्यातच जात असल्यामुळे तेही विनाहेल्मेट आणि भन्नाट वेगाने जाणाºया मोटारसायकली तसेच वाहनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र होते. एकीकडे युवराज आदित्य नवा महाराष्टÑ घडविण्यासाठी युवकांच्या भेटी घेत असताना वाहतुकीचे नियम मात्र पायदळी तुडविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान, नागपूर येथेही अशाच प्रकारे भाजपच्या यात्रेदरम्यान वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिथे कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्याबरोबर अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली या भागातून अशाच प्रकारे जनआशीर्वाद यात्रा जात होती. ठाणे पोलीस या सर्व भागातील वाहतुकीचे नियम तोडणाºयांवर कशी कारवाई करतात, असा सवालही सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.>मोठ्या दंडाची तरतूद करणाºया केंद्राच्या सुधारित मोटार वाहन कायद्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध दर्शवला आहे. म्हणूनच मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन करुन शिवसैनिक आपल्या पक्षाच्या नेत्याच्या याच भूमिकेची रि तर ओढत नाही ना, अशी उपरोधिक टिका या पार्श्वभूमिवर सर्वस्तरातून केली जात आहे.