शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मातेपासून दुरावलेल्या त्या चिमुरडीला शिवसेनेने सांभाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:40 IST

आई, बाबा, आजी, आजोबा या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे १० महिन्यांच्या चिमुरडीचा प्रश्न गहन होता. परंतु वाºयासारखी ही बातमी पसरली आणि शिवसेनेच्या एक ा महिला पदाधिकारीने आता तिची जबाबदारी घेतली आहे.

ठाणे : घरातील आजी, आजोबांना कोरोनाची लागण, त्यात आई आणि वडीलांना देखील कोरोनाची बाधा, आजी, आजीबो आणि वडील मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर आईला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले आहे. परंतु त्याच आई सोबत तिची १० महिन्यांची चिमरुडी देखील होती. ही माहिती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेच्या मंडळींना समजली आणि रातोरात या चिमुरडीचा ताबा घेत, शिवसैनिकांनी तिला आपल्या ताब्यात घेतले. आता ही मुलगी सुखरुप असून तिच्या दोनही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. तिचा सांभाळ येथील एका खाजगी हॉटेलमध्ये सुरु असून शिवसेनेची एका महिला पदाधिकारीच तिचा सांभाळ करीत आहे.             कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर यातील आजी आजोबा आणि १० महिन्यांच्या त्या चिमुरडीच्या वडीलांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुंबईत बेड कमी असल्याने त्या चिमुरडीच्या आईला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिने सोबत आपल्या चिमुरडीलाही घेऊन आली. तिचा सांभाळ करण्यास रुग्णालयातील कोणीच तयार नव्हते. या संदर्भातील माहिती शिरीन अगरवाल यांना ही माहिती समजली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, तसेच आदीत्य ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांन टीव्ट करुन याची माहिती दिली. त्यानंतर मुंबईतून ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राहूल लोंढे यांनी याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली. त्यानंतर कोपरी येथील महिला पदाधिकारी रिना मुदलीयार यांना सोबत घेण्यात आले. मधल्या काळात त्या समाजसेविका अगरवाल यांनी ठाण्यात येऊन मुदलीयार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची घरी त्या चिमुरडीला नेण्याचे निश्चित झाले. परंतु तरीही धोका संभावू शकतो, असे वाटल्याने अखेर तिला येथील एका खाजगी हॉटेलमध्ये नेण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी रात्री सर्व सोपास्कार करुन त्या चिमुरडीला आई कडून ताब्यात घेऊन त्या हॉटेलवर आणण्यात आले. तिला खाण्याचे साहित्य, खेळणी, औषधेही शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली. तिच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे आई आणि कॅनडामधील मावशी देखील संपर्कात आहे.दरम्यान घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण होत असतांना त्या चिमुरडीचा पहिला रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. त्यानंतर ती बाधीत असलेल्या आई सोबत असल्याने तिला लागण तर झाली नसेल ना? हे देखील पाहणे महत्वाचे होते. त्यानुसार तिची दुसरी चाचणी करण्यात आली ती देखील निगेटीव्ह आली. त्यानुसार आता तिचा सांभाळ मुदलीयार या करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या