शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच उबाठाने आपली विचारधारा बदलली: मिलिंद देवरा

By अजित मांडके | Updated: February 24, 2024 20:39 IST

एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची न दिल्यानेच त्यांनी आपली विचारधारा बदलली. याला खऱ्या अर्थाने संधीसाधूपणा म्हणतात.अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी ठाण्यातील रेमंड मैदान येथे आयोजित केलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना केली. दरम्यान, त्यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली नाही.असा ही टोला लगावला.  

पुढे बोलताना, देवरा यांनी तरुण वर्ग म्हणजे देशाचे भविष्य आहे. तरुण वर्गाकडे खूप वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे व्हिजन हवे ते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. असेही ते म्हणाले. तसेच एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास आहे.

तर, पक्षाचे सोशल मीडिया माध्यम वाढविण्यासाठी तरुण वर्गाला यात हिरिरीने सहभाग घ्यायला हवे.असे म्हटले आहे. राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण यांनी नाकारले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आस्थेला नाकारले. तर 20 वर्षांपूर्वी मी काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले पण ते आले नाहीत. त्यांना हिंदू विचारधारा आवडत नाहीत. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील हिंदू सणांना, रूढी व परंपरेला प्रोत्साहन दिले. असेही शेवटी त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना