शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना टेंडरमाफिया

By admin | Updated: February 15, 2017 04:43 IST

कल्याण-डोंबिवलीत सत्तेतील शिवसेना टेंडरमाफिया आहे. मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सत्तेतील शिवसेना टेंडरमाफिया आहे. मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, तो महापालिकेत थेट येत नाही. विविध कामे मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएद्वारे सुरू आहेत. त्यात टक्केवारी खाण्यास वाव नसल्याने शिवसेनेची पाण्याविना मासा, अशी तडफड सुरू आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती पालिकेतील भाजपा गटनेते वरुण पाटील यांनी मंगळवारी दिली.कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यापैकी एक छदामही महापालिकेस मिळालेला नाही. तरीही कल्याण-डोंबिवलीसारखा विकास करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री ठाणे, मुंबई महापालिकेत मतांचा जोगवा मागत आहेत. त्याला ठाणे, मु्ंबईकरांनी फसू नये. मुख्यमंत्री आश्वासनांची गाजरे वाटत आहेत, असा आरोप करीत मुख्यमंत्री खोटारडे आहेत, अशी टीका सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली होती. त्यामुळे पाटील यांनी हल्लाबोल करीत शिवसेनेच्या या आरोपांवर पलटवार केला.महापालिकेतील शिवसेना टेंडरमाफिया आहे. विकासकामाची सगळी टेंडर ही प्रथम ठाण्यात उघडली जातात. त्यानंतर ती कोणाला द्यायची, याचा निर्णय घेतला जातो, असा आरोप करताना त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण पाटील यांचा रोख शिंदे यांच्याकडेच होता, हे खरे. शिवसेनेच्या नगरसेवकांना टक्केवारीत रस आहे. नुकतेच २७ गावांतील ४० कोटींच्या विकासकामासाठी महापालिकेने निविदा मागवली आहे. त्याला केवळ एकाच कंत्राट कंपनीचा प्रतिसाद मिळाला आहे. टेंडरिंगमध्ये रिंग होत असल्याने निविदांना प्रतिसाद मिळत नाही, असे भासविले जाते. महापालिकेत चांगले कंत्राटदार कामे घेण्यासाठी रस घेत नाहीत. टेंडरिंगमधील भ्रष्टाचाराला कंत्राटदारही वैतागले आहेत. ४२० कोटींच्या विकासकामात भ्रष्टाचार होणार असल्याने तत्कालीन भाजपाचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करून त्याला स्थगिती मिळविली. भाजपाला भ्रष्टाचार नको होता, त्यासाठीच गायकर यांनी तक्रार केली. महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार प्रशासनाकडे व आयुक्तांकडे केली होती. मात्र आयुक्त व प्रशासन शिवसेनेच्या भ्रष्टाचारापुढे हतबल आहे. त्यामुळे आता हीच तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे,असे पाटील यांनी सांगितले.बहुतांश प्रकल्प एमएमआरडीएमार्फतअमृत योजनेअंतर्गत विविध प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे. ते जवळपास ४०० कोटी रुपये खर्चाचे असून ते मंजुरीसाठी विचाराधीन आहेत. यातील बहुतांश प्रकल्प हे एमएमआरडीएमार्फत होत आहेत. हा पैसा महापालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही. त्यामुळे या निधीतून शिवसेनेला मलिदा खाता येत नाही. टक्केवारी घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांंना लक्ष्य केले आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)