शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेनेला भगदाड

By admin | Updated: January 31, 2017 03:30 IST

शिवसेनेत इनकमिंग सुरू असतानाच नगरसेविका भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश करत पक्षात सारे आलबेल नसल्याचे उघड केले. भानुशाली यांच्यापाठोपाठ

उल्हासनगर : शिवसेनेत इनकमिंग सुरू असतानाच नगरसेविका भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश करत पक्षात सारे आलबेल नसल्याचे उघड केले. भानुशाली यांच्यापाठोपाठ अनेक जण पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत आणि ओमी कलानी टीम आणि भाजपा त्यांच्यासाठी गळ टाकून बसल्याची चर्चा आहे. उल्हासनगरात भाजपाने ओमी कलानींसह रिपाइंच्या आठवले गटाला सोबत घेत शहर विकास आघाडी तयार केली. शिवसेनेने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. शहराचा विकास डोळ्यांसमोर ठेवून विकास आघाडी बनवल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देतानाच धूळखात पडलेल्या शहर विकास आराखड्याला सत्ता येताच १५ दिवसांत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. एकीकडे ओमी टीमसह भाजपातील असंतुष्ट शिवसेना, साई पक्षात प्रवेश घेत आहेत. त्याच वेळी सेनेच्या नगरसेविका अनिता भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश घेत धक्का दिला. शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी असून तिकीट वाटपादरम्यान मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच पक्षाचा बंंडखोरांशी सामना रंगणार आहे. शिवसेनेत तिकिटासाठी प्रस्थापित नगरसेवकांसह त्यांचे भाऊ, बहीण, पत्नी, आई, मेहुणे आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सामान्य शिवसैनिकांना डावलून घरातच एकापेक्षा जास्त तिकिटांचे वाटप होणार असल्याने मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कट्टर सैनिकांची हेळसांड गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सांगेल ते काम केले. २००७ च्या निवडणुकीत फक्त तीन मतांनी पराभूत झाले, तर २०१२ मध्ये निवडून आले. तरीही, पक्षात सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नसल्याची प्रतिक्रिया नगरसेविका अनिता भानुशाली यांनी दिली. कट्टर शिवसैनिकांची नेहमी हेळसांड होत असून अपमानाची वागणूक मिळत असल्याची भावना शिवसेना शाखाप्रमुख सचिन भानुशाली यांनी व्यक्त केली. या प्रकाराला कंटाळून ओमी कलानी टीममध्ये प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले.