शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने हे ‘करून दाखवले’

By admin | Updated: January 10, 2017 06:44 IST

क्लस्टर योजनेला मंजुरी, रस्ते रुंदीकरण, पदपथ-चौकांचे सुशोभीकरण, सौरऊर्जेवरील दिवे, मत्स्यालय अशी काही वचने पूर्ण करण्यात शिवसेनेला यश आले आहे

ठाणे : क्लस्टर योजनेला मंजुरी, रस्ते रुंदीकरण, पदपथ-चौकांचे सुशोभीकरण, सौरऊर्जेवरील दिवे, मत्स्यालय अशी काही वचने पूर्ण करण्यात शिवसेनेला यश आले आहे.जमेची बाजू म्हणजे ठाणेकरांसाठी क्लस्टर योजना मंजूर झाली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात रेंटलच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यात येत आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी दोन चटई निर्देशांक देण्याची मागणी आहे. शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम सुरू असून काही रस्ते यूटीडब्ल्यूटी पद्धतीने करण्यात आले आहेत, तर काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कॅडबरी, पोखरण १, पोखरण २, स्टेशन परिसर, सर्व्हिस रोड हे रस्ते वाहतूककोंडीतून काही अंशी मोकळे झाले आहेत. पदपथ आणि चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मागील पाच वर्षांच्या काळात जोमाने झाले असून अनेक महत्त्वाच्या पदपथांना आणि चौकांना आपली खास ओळख मिळाली आहे. पदपथांवरील दिवे आणि सार्वजनिक ठिकाणची वीजव्यवस्था सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. तो काही अंशी यशस्वी झाला असून पालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये सौरऊर्जेचा वापर केला जात आहे. रस्त्यावरील पथदिवे आता एलईडीस्वरूपात लावण्याचे काम सुरू आहे.ठाण्यात फिरण्यासाठी येणाऱ्यांना अ‍ॅक्वेरियम (मत्सालय) चे कामही आता काही अंशी सुरू झाले असून लवकरच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.ठाणे शहर वायफाय करण्यासाठी मागील वर्षीच पाऊल उचलण्यात आले. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. ठाणे शहर वायफायच्या दिशेने प्रवास करणार आहे.उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देऊ शकणाऱ्या खाजगी संस्थांना रुग्णालय उभारण्यास पालिकेचे आरक्षित भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, संकार नेत्रालय आणि कॅन्सर रुग्णालयाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले आहेत.