शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी शिवसेनेच्या शिला राखाडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:13 IST

राखाडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी कोनगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिला नंदकुमार राखाडे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती उपसभापती प्रगती पाटील यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्तपदासाठी भिवंडीचे अप्पर तहसीलदार किशोर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत शिला राखाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी मराठे यांनी राखाडे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. राखाडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नवनिर्वाचित उपसभापती शिला राखाडे यांची भेट घेऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण निश्चितच योग्य पद्धतीने पार पडणार असून तालुक्यातील महिला व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया उपसभापती शीला राखाडे यांनी दिली आहे. 

यावेळी माजी सभापती विकास भोईर, , माजी सभापती ललिता प्रताप पाटील, पंचायत समिती सभापती अविता भोईर, गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे , नायब तहसीलदार महेश चौधरी , सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्यासह पंचायत समिती सदस्य, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.