शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-रिपाइंची युती

By admin | Updated: February 1, 2017 03:19 IST

गेल्या आठवडयात स्थापन झालेल्या भाजपा, कलानी (युडीए)तून बाहेर पडून रिपाइंने शिवसेनेबरोबर युती केली. शिवसेना व रिपाइं नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत

उल्हासनगर : गेल्या आठवडयात स्थापन झालेल्या भाजपा, कलानी (युडीए)तून बाहेर पडून रिपाइंने शिवसेनेबरोबर युती केली. शिवसेना व रिपाइं नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. शिवसेनेने रिपाइंला १३ जागा सोडल्या आहेत.यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार बालाजी किणीकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, बी बी मोरे यांनी युतीची घोषणा केली.उल्हासनगरात भाजपा, ओमी कलानी व रिपाइं यांच्या ‘शहर विकास आघाडी’ची स्थापना दोन दिवसांपूर्वी गोल मैदानात झाली. मात्र रिपाइंला सोडण्यात आलेल्या जागेवर कलानी यांनी आपल्या टीमच्या सदस्यांकरिता हक्क सांगण्यात सुरुवात केल्याने ‘युडीए’त वादाची ठिणगी पडली. रिपाइंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी लागलीच शिवशक्ती- भीमशक्तीची हाक दिली. सोमवार रात्री उशिरा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व रिपाइंचे भगवान भालेराव यांनी एकत्र बसून जागावाटप नक्की केले व मंगळवारी युती घोषित केली. रिपाइंला १३ जागा सोडल्याचे लांडगे यांनी सांगितले. मात्र या जागा कोणत्या प्रभागातील आहेत. याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने रिपाइंत सभं्रम कायम आहे. भाजपा-ओमी कलानी यांच्याप्रमाणे शिवसेनाही खेळ खेळते की काय, अशी शंका रिपाइं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)रिपाइंला गेल्या काही दिवसांत गळती लागल्याने पक्ष दुबळा बनला आहे. पक्षाच्या गटनेत्या पुष्पा बागुल तसेच माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत तर पक्षाच्या नगरसेविका आशा बिऱ्हाळे यांनी ओमी टीममध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे एखाद्या मातब्बर पक्षासोबत युती करणे ही रिपाइंची गरज झाली असल्याचे बोलले जात आहे.