शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना-रिपाइं युतीमध्ये फूट, उपमहापौर भालेराव भाजप गोटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:12 IST

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना दीड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपतील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले.

उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत फूट पडली आहे. उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले असून स्वतः त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. १५ एप्रिल रोजी होणारी सभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. आघाडीने भालेराव यांना पद देण्यास नकार दिल्याने रिपाइं बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना दीड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपतील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले. महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अशान तर उपमहापौरपदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. त्यानंतरच्या स्थायी समिती सभापती, विशेष व प्रभाग समिती सभापती ही पदे शिवसेना आघाडीकडे आली. दरम्यान, महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप समर्थक मात्र साई पक्षाचे समिती सदस्य गजानन शेळके यांना शिवसेना आघाडीने आपल्याकडे घेतल्याने, स्थायी समितीत शिवसेना आघाडी व भाजपचे प्रत्येकी आठ अशी समसमान सदस्य झाले. शिवसेना आघाडीकडून रिपाइंचे गटनेते व उपमहापौर भालेराव सभापती पदासाठी इच्छुक होते.सभापतीपदाची निवडणूक १५ एप्रिल रोजी तर अर्ज दाखल करण्याची १२ एप्रिल तारीख होती. समिती सदस्यांची फाटाफूट होऊ नये, म्हणून शिवसेना आघाडीने ठाणे जिल्ह्यातील एका फार्म हाऊसमध्ये शिवसेना आघाडीच्या समिती सदस्यांना ठेवले. तर भाजपने पक्षाच्या समिती सदस्यांना गोवा दर्शनासाठी नेले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. सभापतीपदासाठी इच्छुक भालेराव यांना शिवसेना आघाडीने पद देण्यास नकार दिल्याचे समजते. यातून भालेराव भाजपच्या गोटात गेल्याचे बोलले जात आहे. भालेराव यांनी भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन स्थानिक राजकीय परिस्थिती समजून सांगितली. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी फडणवीस व भालेराव यांच्या भेटीला दुजोरा दिला.

शिवसेना विकास आघाडी कायमशहरातील शिवसेना महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसह काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, राष्ट्रवादी पक्षाचा समावेश आहे. त्यापैकी रिपाइंचे भगवान भालेराव हे भाजप गोटात सहभागी झाल्याचे समजले. त्यांच्याकडे उपमहापौरपद असताना स्थायी समिती सभापतीपद मागणे उचित नाही. त्यापेक्षा शिवसेना आघाडीला सभापतीपद नको, अशी पक्षाची भूमिका असून शिवसेना आघाडी कायम आहे, असा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर