शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:51 IST

ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा शहापूर येथे नुकताच आयोजित केला होता.

कसारा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावत ठाणे जिल्ह्यासह नाशिक ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवण्याचे काम ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शक्य झाल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर येथे आयोजित ज्येष्ठ शिवसैनिक सन्मान सोहळ्यात केले.ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा शहापूर येथे नुकताच आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. शिंदे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी अनेक उदाहरणे दिली. शिवसेनाप्रमुखांच्या कृपाशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने माझ्यासारखा शाखाप्रमुख असलेला शिवसैनिक नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि एका जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकतो अन् हे फक्त शिवसेनाच करू शकते.आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आहेच. भारतभर शिवसेनेने आपल्या शाखा स्थापल्या आहेत. तरीही, शिवसेना आणि ठाणे हे वेगळे समीकरण आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला आहे. रात्रंदिवस एक करून दिघेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावत समाजकारण करणाऱ्या शिवसैनिकांनी प्रसंगी अनेक यातना भोगल्या. पोलिसांचा मार खाल्ला.कुटुंबापासून दुरावले, असे अनेक प्रसंग आहेत. या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात येतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. परंतु, हा सन्मान म्हणजे पक्षातून निवृत्ती मुळीच नसून ज्येष्ठ शिवसैनिकांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची साथ युवा पिढीला मिळावी. तसेच ज्येष्ठ सैनिकांच्या कार्यपद्धतीची माहिती शिवसैनिकांना मिळावी, यासाठी हा सन्मान असल्याचे स्पष्ट केले.अन् ज्येष्ठ शिवसैनिकांना अश्रू अनावर झालेपालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान घेण्याअगोदर प्रास्ताविक करणाºया काशिनाथ तिवरे यांनी शहापूर तालुक्यातील कसारा, वासिंद, किन्हवली, डोळखांब, वाशाळा, ठाकणे यासह अन्य विभागांत कार्य केलेल्या प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकांची ओळख करून देत त्या शिवसैनिकांनी पक्षासाठी केलेला त्याग, भोगलेल्या यातनांचा पाढा शिंदेंसमोर मांडला. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असताना केलेल्या त्यागामुळे एका मंत्र्याच्या हस्ते आपला सन्मान होतो, हे पाहून उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिकांचे अश्रू अनावर होत होते.या सोहळ्यासाठी उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, काशिनाथ तिवरे व महिला आघाडीच्या रश्मीताई निमसे, गुलाब भेरे, रजनी शिंदे, शहापूर नगराध्यक्षा अश्विनी अधिकारी, पं.स. सभापती शोभाताई मेंगाळ, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव, मा.आ. दौलत दरोडा, भिवंडी आ. शांताराम मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना