शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराला मच्छिमारांसह शिवसेनेचाही विरोध

By admin | Updated: June 29, 2015 04:20 IST

वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

ठाणे: पालघर जिल्हयातील वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष तसेच पालघरचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी दिला आहे. पालघर मच्छिमार भवन येथे संघर्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ठाणे जिल्हा मच्छिमार संघाच्या वतीने आयोजित बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. या बैठकीला पालघर, मुंबई, ठाणे, रायगडमधून मोठया संख्येने नागरिक व मच्छीमार बांधव उपस्थित होते. वाढवण येथे नविन जेएनपीटी आणि पी अ‍ॅन्ड ओ च्या नव्या बंदराचा प्रस्ताव अंमलात आणला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मच्छीमार बांधवांचा मूळ व्यवसाय धोक्यात येऊन हा समाज आणि मच्छिमार बांधव उद्ध्वस्त होतील. सध्या इतर ठिकाणी मच्छीमारांना चांगली मासेमारी करता येत नाही. परंतु, याठिकाणी मच्छीचा चांगला झोन असल्याने तो नाहीसा होईल. तसेच तारापूर अनुसूचित केंद्र आणि पाकिस्तानची सीमा जवळ असल्यामुळे या बंदरालाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले. १९८८ च्या सुमारास युती शासनाच्या काळात वाढवण येथे अशा प्रकारे बंदर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, परिसरातील सर्व स्थानिक आणि मोठया प्रमाणात मच्छिमारांनी केलेल्या विरोधानंतर खुद्द वाढवण येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांचे तसेच कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या विनंतीनुसार तातडीने निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा युती शासन सत्तेवर असल्यामुळे आपल्या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असा विश्वास तरे यांनी बैठकीत व्यक्त केला. (प्रतिनिधी)