शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या प्रवक्त्यास शिवसेनेची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:31 IST

शिवसैनिक नाराज; मेहतांविरोधात भूमिका

मीरा रोड : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भाजपने विरोध केल्याने आमदार नरेंद्र मेहतांबाबत शिवसेनेत संतापाची लाट उसळून, निवडणुकीत त्यांच्यासाठी काम न करण्याचा इशारा देणारे शिवसेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे यांना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी आमदार प्रताप सरनाईकांच्या निर्देशानुसार खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यासाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसैनिकांबद्दल गर्व आहे, असे आधी सांगणाºया सेना नेत्यांनीच आता खुलासा मागवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.१७ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समिती बैठकीत सत्ताधारी भाजपाने बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या निविदा मंजुरीचा विषय न घेतल्याने झालेल्या वादातून शिवसेना नगरसेवकांची भाजप नगरसेवकांसोबत धक्काबुक्की होऊन त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले होते. याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पांडे यांनी आपली भूमिका मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला. सेना व भाजपप्रमुखांच्या नावे पत्रव्यवहार करून आ. मेहतांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांच्या निर्देशावरून सेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी सोमवारीच पांडे यांना या मुद्यावर लेखी खुलासा सादर करण्याचे पत्र दिले. पांडे हे नगरसेवक नसताना पालिकेत गेले आणि तेथील वादात सहभागी झाले. त्यानंतर, व्हिडीओ क्लिप व पत्राद्वारे सेनेच्या वरिष्ठांना न विचारता परस्पर आ. मेहतांचा प्रचार न करण्याची भूमिका परस्पर मांडली. युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असून, पांडे यांनी शिस्त पाळली नसल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत तीन दिवसांत खुलासा सादर करून, तोपर्यंत पक्षाच्या आदेशाशिवाय कुठलेही पत्र वा व्हिडीओ प्रसिद्ध करू नये, अशी सूचना म्हात्रे यांनी केली आहे.पालिकेत शिवसैनिकांची कामे भाजपच्या दबावाखाली केली जात नाहीत. विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. अशा परिस्थितीत पांडेंकडूनच जिल्हाप्रमुखांनी खुलासा मागवल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या निवडणुकीआधी गोडदेवनाक्यावर ग्रामस्थांसोबत झालेल्या मेहता व समर्थकांमधील वादानंतर सेनेने नगरसेविका तारा घरत यांच्याविरोधात पत्र काढले होते. त्याच्या प्रती भाजपने गावागावांत वाटल्या होत्या, हे विशेष.पालिकेतील तोडफोड प्रकरणी भाजपच्या दबावामुळे १७ नगरसेवकांसह अन्य शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, सेना नगरसेवकांच्या घरी पोलीस पाठवण्यात आले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना