शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकाम कारवाईविरोधात सेनेची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:29 IST

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण : घरे पाडल्याने नागरिकांमध्ये भीती

कसारा  : कसारा येथील वनविभागाच्या जागेवर गोरगरीब नागरिकांनी बेकायदा बांधकामे केली होती. ती बांधकामे वनविभागाने गुरुवारपासून पाडायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे शेकडो नागरिक भयभीत झाले आहेत. उर्वरित कारवाई शुक्रवारपासून सुरू होणार होती. या कारवाईला विरोध करण्यासाठी शिवसेनेने उडी घेतली.शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य मंजूषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वनविभागाविरोधात जनआंदोलन सुरू केले. सकाळी ८ पासून संपूर्ण कसारा परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून कारवाईला विरोध करीत होते. या आंदोलनासाठी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जि.प. अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनास गालबोट लागू नये, यासाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये यांनी वनविभागाचे अधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्ते यांच्यात समन्वय साधला. आंदोलकांचे शिष्टमंडळ व वनअधिकारी यांच्यात बैठक पार पडली. पाटील यांनी तत्काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. कसारा गावातील अतिक्रमण कारवाईबाबत माहिती दिली. या प्रकरणी शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईस स्थगिती देण्याची सूचना केली. दरम्यान, यापुढे कोणीही अतिक्रमण करू नका, असे आवाहन पाटील यांनी ग्रामस्थांना केले. जी बांधकामे अस्तित्वात आहेत, ती पाडली जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.कारवाईनंतर अनेक जण आजारीवनजमिनीवरील अतिक्रमण कारवाई सुरू झाल्याने अनेक ग्रामस्थ भयभीत झाले. या कारवाईमुळे अनेक जणांना हृदयविकाराचा त्रास झाला. कोणी रुग्णालयात दाखल झाले. आंदोलनाची सांगता झाल्यावर आमदार दौलत दरोडा यांनी पीडित ग्रामस्थांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. कसारा येथे जाऊन वनअधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांची भेट घेत कारवाई थांबवण्याबाबत चर्चा केली. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.तानाजीनगर येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार नसून नागरिकांनी घाबरू नये. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी तोडगा काढून अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रयत्न करू.        - प्रकाश पाटील,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुखवनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सहा महिन्यांपासून या ग्रामस्थांना नोटिसा दिल्या जात आहेत. परंतु, नोटीस बजावूनही बेकायदा बांधकाम सुरूच असल्याने कारवाई करणे भाग पडले.    - पी.बी. उबाळे, वनअधिकारी, विहीगाव, कसारा रेंज