शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका स्थायी समिती सभापती पद शिवसेनेकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:23 IST

Ulhasnagar : उल्हासनगरात शिवसेनेच्या राजकीय खेळीने भाजपात उभी फूट, स्थायी समिती सदस्य डॉ नाथानी यांचाही राजीनामा

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पद राहण्यासाठी सभापती पदासाठी चक्क भाजपच्या विजय पाटील यांना सूचक, अनुमोदन देऊन शिवसेनेने अर्ज दाखल करायला लावला. तर आज भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ प्रकाश नाथानी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, गुरुवारी होणाऱ्या सभापती पदासाठी शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. 

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली. मात्र स्थायी समिती सभापती पद भाजपकडे असल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती. स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून स्थायी समिती सभापती पद शिवसेनेकडे राखण्यासाठी शिवसेनेला भाजप समिती सदस्य फोडण्यात यश आले. समिती सभापती पदासाठी भाजप कडून जया माखिजा व राजू जग्याशी यांनी तर शिवसेने कडून भाजपचे समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक व अनुमोदक देऊन अर्ज दाखल केला. स्थायी समितीच्या एकून १६ सदस्या मध्ये भाजपचे ९, शिवसेना-५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या विजय पाटिल यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने समिती मध्ये भाजप व शिवसेना आघाडीचे प्रत्येकी ८ सदस्य राहिल्याने, चिट्टी काढून सभापती पदाची निवड होणार असे अटकळे बांधले जात होते.

 आजच्या महापालिका महासभा पूर्वी भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ प्रकाश नाथानी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, भाजपला धक्का बसला. तर शिवसेनेचे समिती मध्ये बहुमत झाल्याने सभापती पदी विजय पाटील यांचा विजय निश्चित झाला. शिवसेनेच्या राजकीय खेळीने भाजपात ऐन स्थायी समिती सभापती निवडणुकी पूर्वी फूट पडल्याने भाजपचे स्थायी समिती सभापती पदाचे स्वप्न भंगले आहे. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच भाजप- शिवसेनेची युती महापालिकेत कित्येक वर्ष सत्तेत होते. मात्र थेट पक्षांतर्गत फडाफोडी खासदार शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी करून त्यांनी स्थानिक भाजप पक्ष कार्यकर्ता कडून विश्वास गमविल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. भाजपात फाटाफूट करून महापालिका सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेची प्रतिमा शहरात मालिन झाल्याचेही पुरस्वानी यांनी म्हटले. 

 स्थायी समिती सभापती पद शिवसेनेच्या ताब्यात - गोपाल लांडगे गुरुवारी स्थायी समिती सभापती पदी शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी दिली. भाजपला आपले सदस्य सुरक्षित ठेवता येत नसल्याने ती त्यांची चुकी आहे. महापौर व उपमहापौर पद शिवसेना महाआघाडी यांच्याकडे असून स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापती पदही आघाडीकडे राहणार असल्याचे संकेत लांडगे यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv Senaशिवसेना