शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गाजावाजा न करता शिवसेनेची कलाकारांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

अंबरनाथ : कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिकांसोबतच कलाकारांचेदेखील जगणे मुश्कील झाले आहे. त्याअनुषंगाने अंबरनाथ येथील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी ...

अंबरनाथ : कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिकांसोबतच कलाकारांचेदेखील जगणे मुश्कील झाले आहे. त्याअनुषंगाने अंबरनाथ येथील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला. मात्र, ही मदत करताना त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही, मदत करतानाची साधी छायाचित्रेही काढली नाहीत.

टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य कलाकारांनादेखील बसला आहे. चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण बंद असल्याने कलाकारांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. लेखक, वादक आणि अभिनय क्षेत्राशी निगडित असलेली मंडळी यांच्यासमोर मोठी आर्थिक विवंचना निर्माण झाली होती. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून शहरातील कलाकारांना अन्नदान, धान्य व इतर वस्तूंची मदत करण्यात आली. अंबरनाथच्या अंबर रोटरी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कलाकारांना मदत देत असताना त्याचे कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले नाही. कार्यक्रमस्थळी एका ठिकाणी ही मदत ठेवण्यात आली होती. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उठून बाजूला गेले आणि कलाकारांनी स्वेच्छेने येऊन ही मदत घेतली. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपशहरप्रमुख परशुराम पाटील, सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, निखिल चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------