शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा वाद आला रस्त्यावर; स्पर्धेच्या नावावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:28 IST

उपनगराध्यक्षांचे भीख मांगो आंदोलन

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. मात्र, या स्पर्धेला नगराध्यक्ष चषकाऐवजी रमेश गोसावी चषक नाव देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट निर्माण झाले होते. उपनगराध्यक्ष हे रमेश गोसावी चषक स्पर्धेसाठी आग्रही होते. मात्र, पालिकेत अशा नावाने स्पर्धा घेण्याचा विषय मंजूर नसल्याने त्या नावावर स्पर्धा घेता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका प्रशासनाला पुढे करून स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री भीख मांगो आंदोलन केले. प्रत्यक्षात, हे आंदोलन प्रशासनाला पुढे करून केले असले, तरी या आंदोलनाचा कल मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच होता.अंबरनाथ पालिकेत सत्ताधाºयांच्या दोन गटांत चांगलीच जुंपली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन गटांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अंबरनाथ पालिकेत नगराध्यक्ष चषक शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याबाबत १० लाखांचा विषय मंजूर झाला होता. या स्पर्धा शिक्षण समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याने उपनगराध्यक्ष शेख यांनी ही स्पर्धा रमेश गोसावी चषक नावाने घेण्यासंदर्भात पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता.मात्र, त्यावरून राजकारण चांगलेच तापले. मुळात ही स्पर्धा रमेश गोसावी चषक नावाने घेण्याबाबत कोणताही ठराव झाला नव्हता. त्यातही ही स्पर्धा त्याच नावाने घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, प्रशासनाला सत्ताधाºयांच्या दुसºया गटानेही कडाडून विरोध केला. यामुळे वातावरण तापले आहे.शेख यांच्या वतीने स्पर्धा:प्रशासनाने रमेश गोसावी चषक नावाला विरोध केल्याने उपनगराध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पालिका कार्यालयात हे आंदोलन होणार होते. मात्र, त्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे शेख यांनी गुरुवारी रात्री पालिका प्रशासनाविरोधात भीख मांगो आंदोलन केले. दरम्यान, उद्या शेख यांनी पालिकेला बाजूला सारून ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना