शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

By admin | Updated: March 10, 2017 04:19 IST

इमारतीच्या बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविक ा माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे

कल्याण : इमारतीच्या बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविक ा माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर घराजवळच दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० जणांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला विकासक व भाजपा पदाधिकारी संजय मोरे आणि शिवसेना उपशहर संघटक संजय गायकवाड यांनी केला आहे, असा आरोप नगरसेविक ा काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ९९ ‘आमराई’च्या नगरसेविका काळे आणि त्यांचे पती प्रशांत हे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून विजयनगर येथील आपल्या घरी परतत होते. ते घराजवळ पोहोचले असता त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० अनोळखी व्यक्तींनी प्रशांत यांच्यावर लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.आमराई-विजयनगर प्रभागातील एका नवीन इमारतीच्या बांधकामाची माहिती नगरसेविका काळे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मागवली होती. त्यात विकासकांनी इमारतीच्या बांधकाम आराखड्यात तळमजल्यावर वाहनतळ असल्याचे दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या वाहनतळाच्या जागा विकासकांनी भिंती बांधून सदनिका, व्यापारी गाळे बांधून विकले आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विकासक मोरे व गायकवाड अडचणीत आले आहेत. दरम्यान, विकासकांनी केलेल्या या नियमबाह्य कामाबाबत काळे गेल्या महिन्यापासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करीत आहेत. या पाठपुराव्यामुळे गायकवाड व मोरे अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे पती प्रशांत यांच्यावर हा जीवघेणा झाला आहे. तसेच याच कारणावरू न त्यांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यातही अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप नगरसेविका काळे यांनी केला. (प्रतिनिधी)- प्रशांत काळे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी व माझे साथीदार संजय गायकवाड दोघेही आपल्या घरात होतो. तसे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही. तसेच आमच्या कोणत्याही बांधकामात अनधिकृतपणा आढळल्यास त्यावर महापालिकेने कारवाई करावी, असेही विकासक व भाजपा पदाधिकारी संजय मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.