शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

शिवसेना नगरसेवकाच्या कंपनीला घातला ३५ लाख रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:40 IST

डोंबिवलीतील भामट्यास अटक; पोलीस कोठडीत रवानगी

ठाणे : नामांकित कंपनीत बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ३४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या अवधेश सिंग ऊर्फ राहुल (रा. डोंबिवली) या भामट्याला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या सावरकरनगर येथील रहिवासी रमेश चव्हाण यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांचे मित्र सदाशिव गोडसे यांची शिवसागर ही कन्स्ट्रक्शन्स कंपनी आहे. यामध्ये चव्हाण, सदाशिव गोडसे, ठाणे महापालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के व गणेश पाटील हे भागीदार आहेत. या कंपनीने अनेक मोठे प्रकल्पही राबवले आहेत. डोंबिवलीतील दावडी येथील अवधेश याने शिवसागर कंपनीला एल अ‍ॅण्ट टी या कंपनीचे वडाळा येथे सिव्हील कामाचे कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्याचा व्हेंडर कोड मिळविण्यासाठी तीन लाख ६० हजारांची रक्कम रोख आणि धनादेश स्वरूपात त्याने सप्टेंबर २०१७ ते २८ जून २०१८ या काळात घेतली. हे काम चालू झाल्यानंतर कामगारांचे पगार करण्यासाठी वेळोवेळी इंड्स एण्ड बँकेच्या पवई शाखेच्या खात्यात चव्हाण यांच्या कंपनीकडून २६ लाख ७० हजारांची रक्कम आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात घेतली. तसेच त्याचे भागीदार विनयकुमार शुक्ला व संदीप सिंग यांनीही हे काम करीत असल्याचे सांगून साडेचार लाखांची रक्कम घेतली. अशा प्रकारे अवधेश व त्याचे भागीदार विनयकुमार आणि सिंग यांनी आपसात संगनमत करून चव्हाण तसेच नगरसेवक बारटक्के यांच्याकडून एल अ‍ॅण्ड टी कंपनीत मिळवलेल्या कामाचे व्हेंडर कोड आणि कामाची वर्क आॅर्डर देतो, असे सांगून ३४ लाख ८० हजारांची रक्कम घेतली. अर्थात, हे व्हेंडर कोड आणि कामाची वर्क आॅर्डर तर मिळवून दिली नाहीच, शिवाय त्याने कामाचे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी याप्रकरणी २९ आॅगस्टला वर्तकनगर पोलीस ठाण्यात अवधेश, विनयकुमार आणि संदीप या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने अवधेश याला २५ सप्टेंबरला अटक केली. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीShiv Senaशिवसेना