शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपाला बंडोबांचे बालेकिल्ल्यात आव्हान

By admin | Updated: February 6, 2017 04:43 IST

ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये बंडखोरीची लागण झाली असून या बंडोबांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आटापिटा सुरू झाला आहे.

ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये बंडखोरीची लागण झाली असून या बंडोबांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आटापिटा सुरू झाला आहे. असे असले तरी नौपाड्यात या बालेकिल्ल्यास शिवसेना आणि भाजपामध्ये अधिकची बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसमोर बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या इच्छुकांनी अपक्षांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांमध्येही असंतोष असून ते सुद्धा रिंगणात उतरले आहेत.ठाण्यातील नौपाड्याचा प्रभाग क्रमांक २१ हा शिवसेना आणि भाजपाला मानणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजपाचे एकतर शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेपेक्षा भाजपाला या भागातून जास्त मतदान झाले होते. त्यामुळे या प्रभागातून उमेदवारी मिळवून नगरसेवक होण्याचे स्वप्न भाजपाच्या तब्बल ३८ जणांना पडले होते. मात्र, पक्षाने या प्रभागातून संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिमा मढवी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडीमुळे पक्षात कमालीचा असंतोष निर्माण झाला असून माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे पती सुनील तसेच विशाखा कणकोसे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याशिवाय, डावलले गेलेल्या अन्य इच्छुकांमध्येसुद्धा कमालीचा असंतोष असून त्यांनीही पक्षाचे काम न करण्याचा निर्धार केला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्यामुळे या बंडखोरांची समजूत काढणार कोण, असा सवाल निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे उभा ठाकला आहे. त्यातच तिकीटवाटपात नेतृत्वाने डावलल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपाविरोधात वातावरण अधिक पेटल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शिवसेनेचे या ठिकाणी तीन नगरसेवक असल्याने येथून आता अनेकांनी नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पक्षाने विलास सामंत, हिराकांत फर्डे आणि सुजाता पाटील या विद्यमान नगरसेवकांसह सीमा राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चारही शाखाप्रमुखांनी बंडखोरी केली असून अप्पा वेटे, राजश्री गजमल, चंद्रकांत टेंबे यांची मुलगी, सुरेश टेंबे यांची पत्नी, उपविभागप्रमुख संदीप झांबरे यांची पत्नी व राकेश साठे यांनी आपल्या आईला रिंगणात उतरवले आहे. विभागप्रमुख प्रकाश पायरे, बाळा गवस ही मंडळीसुद्धा नाराज आहे. नाराज शिवसैनिकांना जवळ करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. सेना नेतेसुद्धा या असंतुष्टांना शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)