शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:55 IST

ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच शिवसेनेने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असतांनाही आजही शहरात लोडशेंडींगचा प्रश्न कायम आहे, शहरासह कळवा, मुंब्रा या भागात पाच ते सहा तास वीज गायब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेत असतांना ठाण्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. तसेच आता राज्यासाठी पुरेशी वीजही उपलब्ध आहे. परंतु,असे असतांनाही ठाण्यासारख्या शहराला वीजेचा प्रश्न भेडसावत असेल तर हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयशच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. नियोजनाचा उडालेला बट्टयाबोळ, पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. शाई धरणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षे खीतपत पडला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, किंबहुना या कामाला गती का मिळाली नाही, असा सवालही त्यांनी केला. गडकरी रंगायतनावर आता म्हणे छत अंथरण्याचे काम सुरु आहे. परंतु, आधीच जर त्याचे पीओपी मजबुत केले असते तर आज हा पैसा खर्च करण्याची वेळच का आली असती असा सवालही त्यांनी केला.स्थायी समिती नाहीघाणेकर नाट्यगृहाचे छत कोसळतेच कसे, दीड वर्ष उलटूनही ते खुले का केले नाही, मेट्रोबाबत खंबीर पावले का उचलली जात नाहीत, घनकचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही, रस्त्यांची चाळण झालेली आहे, परिवहनची सेवा सक्षम नाही, महापालिका निवडणूक पार पडूनही स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचेच पाप असल्याचे ते म्हणाले.