शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आणि काँग्रेस एकत्र?

By admin | Updated: June 30, 2017 02:51 IST

मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी भिवंडी, मालेगावप्रमाणे शिवसेना, काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी भिवंडी, मालेगावप्रमाणे शिवसेना, काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतून इनकमिंग वाढते आहे, तर शिवसेनेने आधीच आपली बाजू भक्कम केली आहे. त्यातही भाजपातील इच्छुकांच्या प्रचंड संख्येतून बंडखोरी झाल्यास ती सामावून घेण्याची तयारीही या पक्षांत आहे. त्याची चुणूक या पक्षांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाला दाखवून दिली.स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत परिवहन सेवेच्या प्रस्तावावर शिवसेना, काँग्रेस एकत्र आली आणि भाजपाची कोंडी करत त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.पालिकेने स्थानिक परिवहन सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) संकल्पनेवर सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. त्याला भाजपाने विरोध केला. मात्र शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत त्याला मान्यता दिली. पालिकेने जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत दुसऱ्या टप्प्यात १०० बस खरेदी करून २५ सप्टेंबर २०१५ मध्ये नव्याने सेवा सुरू केली. ही सेवा केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या सल्ल्यानुुसार जीसीसी तत्वावर सुरू करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली. त्याच्या निविदा अनेकदा प्रसिद्ध करुनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा कंत्राटावर सुरू झाली. त्यात १०० पैकी ४८ बस समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५२ बस जीसीसी सेवा सुरू होताच दाखल केल्या जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. या बस सध्या कंपन्यांमध्ये धूळखात असून त्यांची मुदतही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. जीसीसी संकल्पनेवर सेवा सुरू करण्यासाठी दिल्ली येथील श्यामा श्याम सवर््िहस सेंटर या एकमेव कंपनीने निविदा भरल्याने त्याचा विचार जीसीसीसाठी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार कंपनीने पालिकेला दरपत्रक दिले. त्याला स्थायीची मान्यता मिळावी, यासाठी पालिकेने तो प्रस्ताव गुरूवारच्या बैठकीत ठेवला. त्यावर हा प्रस्ताव सविस्तर मांडला नसून तो पुन्हा करावा, असा ठराव करुन त्याला भाजपाने विरोध दर्शविला. सेनेने मात्र शहरातील प्रवाशांची निकड लक्षात घेत कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करुन प्रस्तावाच्या बाजूची भूमिका घेतली. दोन्ही ठरावावर मतदानाची मागणी झाली. मतदानावेळी काँग्रेस सेनेसोबत गेली.