शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे दागिने घेऊन पळणाऱ्या रिक्षा चालकास शिताफीने अटक ,आठ लाखांचे दागिने हस्तगत

By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2023 19:16 IST

बँकेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका दाम्पत्याची दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली.  

ठाणे : बँकेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका दाम्पत्याची दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली.  ही बॅग घेऊन पसार झालेला रिक्षा चालक शिवप्रसाद गुप्ता (३७, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून आठ लाख आठ हजारांचे दागिने आणि रिक्षाही जप्त केली आहे. 

ठाण्यातील एक दाम्पत्य ९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील आयसीआयसीआय या बँकेत दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी रिक्षाने गेले होते. ते बँकेसमोर रिक्षातून उतरत असतानाच चालकाने रिक्षातील बॅग घेऊन रिक्षाने पळ काढला. दाम्पत्याने या प्रकरणी त्वरित नौपाडा पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. धुमाळ आणि निरीक्षक आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार राजेंद्र गायकवाड, सचिन रांजणे, गोरखनाथ राठोड आणि जयेश येळवे आदींच्या पथकाने घटनास्थळ ते रिक्षा चालक पळून गेलेल्या दिशेने असलेल्या तब्बल ३५ सीसीटीव्हींची पाहणी केली.

एका सीसीटीव्हीमध्ये ही रिक्षा आढळल्यानंतर तिचा क्रमांक काढण्यात आला. त्यानंतर चालकाचा मोबाईल क्रमांक काढण्यात आले. तो शिवप्रसाद हा चालक लोकमान्यनगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्याची ओळख पटल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले.  त्याने या गुन्हयाची कबूली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. दागिन्यांच्या बॅगेसह गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली.

टॅग्स :thaneठाणे