शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांवर शिंदे झाले नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:14 IST

अधिकाऱ्यांना सुनावले : नगरसेवकांचा निधी, बेकायदा बांधकामांची मागवली माहिती

ठाणे : ठाणे महापालिकेतील आयुक्त संजीव जयस्वाल व नगरसेवक यांच्यातील वाद गुरुवारी आणखी चिघळला. जयस्वाल यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणाºया नगरसेवकांच्या कोणत्या कामाला निधी दिला आहे किंवा कोणता नगरसेवक अनधिकृत बांधकामात राहतो, याची माहिती मागवल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुढाकार घेऊन सादर केलेले बहुतांश प्रस्ताव त्यांनी मागे घेतले आहेत. या प्रकारामुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही संतापले आहेत.

अविश्वास ठराव आणल्याचा राग मनात धरून आयुक्तांनी तब्बल ४८ प्रस्ताव बुधवारी अचानक मागे घेतले. यात महापौर शिंदे यांच्या पुढाकाराने आलेल्या प्रस्तावांनाही कात्री लावल्याची माहिती गुरुवारी उघड झाली. याशिवाय, स्थावर मालमत्ता विभागाने कोणाला कोणत्या मालमत्ता दिल्या, बांधकाम विभागाने कोणाला किती निधी दिला, अनधिकृत बांधकामात कोणते नगरसेवक राहतात, कोणाची अनधिकृत बांधकामे आहेत आणि शहर विकास विभागाने कोणकोणत्या नगरसेवकांच्या इमारतींना सीसी दिली आदींची यादी आयुक्तांनी मागवल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी भाजप नगरसेवकांना ब्लॅकमेलर म्हणणाºया आयुक्तांनी अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यावर घेतलेली भूमिका वेगळी आहे का, असा सवाल काही नगरसेवकांनी केला.

एकनाथ शिंदेंची तंबी : महासभेत बुधवारी झालेल्या गोंधळानंतर पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून यापुढे आयुक्तांसाठी माझ्या दारात येऊ नका, असे खडेबोल सुनावल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.गोरगरीब हृदयरोगरुग्णांना वादाचा फटकाहृदयरोगावरील उपचारांसाठी कळवा किंवा सिव्हील रुग्णालयात कोणत्याही स्वरूपाची व्यवस्था नाही. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर कळवा रु ग्णालयात उपचार सुरू करण्याचा प्रस्ताव होता. पिवळे आणि केशरी रंगाचे रेशनकार्डधारक असलेल्या गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना एकही पैसा खर्च न करता तेथे उपचार दिले जाणार होते. प्लॅटिनम या सेवाभावी रु ग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च होणार नव्हता. परंतु, महापौरांच्या पुढाकाराने आलेली ही योजना न राबवण्याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्याचा मेसेज अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्त-नगरसेवक वादाचा विनाकारण गोरगरिबांना फटका बसणार आहे.लोकप्रतिनिधींना दिलेल्या भूखंडाची यादी मागवलीमहासभेत मुंबईतल्या दोन शैक्षणिक संस्था आणि ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलला विनामूल्य भूखंड देण्यावरून वाद झाला होता. प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये संघर्षाची ठिणगी त्याच प्रस्तावांवरून पडली होती. त्यामुळे यापूर्वी ठाण्यातील लोकप्रतिनिधींशी संबंधित संस्थांना अल्पदरात जे भूखंड दिले आहेत, त्यांच्याहीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर काही संस्थांनी भूखंडांचे भाडे थकवले आहे.

तर, घोडबंदर रोडवरील एका आमदाराच्या संस्थेला अडीच हजार चौरस मीटर अतिरिक्त जागा दिली आहे. शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांनी केलेल्या मागणीनुसार ती काढून घेण्याचे आदेश अधिकाºयांना दिल्याचेही सांगण्यात आले. आयुक्तांनी लोकप्रतिनिधींविरोधात घेतलेल्या या पवित्र्यामुळे वाद आणखी चिघळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. स्थावर मालमत्ता विभागाने कोणत्या नगरसेवक, आमदाराला महापालिकेची मालमत्ता दिली, त्याची थकबाकी आहे का, तेथे काय सुरू आहे, याची माहिती आयुक्तांनी मागवली आहे.अतिक्रमण विभागालाही कोणकोणते नगरसेवक अनधिकृत बांधकामात राहतात, कोणी अनधिकृत बांधकामे उभारली आहेत, बांधकाम विभागामार्फत कोणाला किती निधी दिला, तो कसा दिला, प्रभाग सुधारणा निधी, नगरसेवक निधी आणि शहरविकास विभागाने कोणकोणत्या लोकप्रतिनिधींच्या बांधकामांना सीसी, ओसी दिली, कशा पद्धतीने दिली, वाढीव बांधकामे झाली आहेत, याची यादीच त्यांनी मागवल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

महासभेने विषय मंजूर केल्यानंतर ते मागे घेण्याचे किंवा रद्द करण्याचे कोणतेच अधिकार आयुक्तांना नाहीत. त्यामुळे ४८ विषय मागे घेत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले, तरी ते मागे घेतले जाणार नाहीत. त्यावर जो काही निर्णय व्हायचा आहे, तो सभागृहातच होईल. त्याशिवाय, कळवा रुग्णालयातील योजना ही माझ्या पुढाकाराने आली असली, तरी ती गोरगरीब जनतेसाठी आहे. एकीकडे ठाणेकरांना लुटणाºया रुग्णालयाच्या घशात ५० कोटी रु पये बाजारभाव असलेला भूखंड फुकट घालायचा आणि विनामूल्य आरोग्यसेवा देणाºया संस्थेची दारे बंद करायची, हे योग्य नाही.

- मीनाक्षी शिंदे, महापौर

टॅग्स :tmcठाणे महापालिका