शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सेनेच्या यादीत शिंदेंचा वरचष्मा

By admin | Updated: February 5, 2017 03:06 IST

अखेर शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थोपवण्याचे प्रयत्न करूनही ते थंंड झालेले नाहीत. श्रेष्ठींनी आवाहन करूनही अनेकांनी बंडाचे निशाण कायम ठेवले असून पक्षाच्या

ठाणे : अखेर शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थोपवण्याचे प्रयत्न करूनही ते थंंड झालेले नाहीत. श्रेष्ठींनी आवाहन करूनही अनेकांनी बंडाचे निशाण कायम ठेवले असून पक्षाच्या यादीवर पुन्हा एकदा एक्का शेठ अर्थात पालकमंत्री एकनाथ शिंदे ऊर्फ भाई यांचे वर्चस्व दिसून आले. दुसरीकडे तीन आमदारांनीही घरच्यांबरोबर काही जवळच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देऊन निष्ठावंतांची नाराजी ओढवून घेतली आहे. परंतु, राजन विचारे यांच्या समर्थकांचा पत्ता बहुतेक ठिकाणी कापल्याचे दिसत आहे.या यादीत विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून अनेक जण पुन्हा पाचव्या आणि सहाव्या वेळेस नशीब आजमावणार आहेत. त्यांची संख्या ५० टक्के आहे. सेनेने शुक्रवारी सायंकाळी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पक्षातली घराणेशाहीची परंपरा कायम राखली आहे. जवळपास ६५ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा तिकीट दिले आहेत. तर, खुल्या प्रवर्गातून उमेदवारी मिळू शकत नसलेल्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे १७ विद्यमान नगरसेवकांना मात्र या यादीत स्थान मिळालेले नाही. १३१ पैकी १२० जागांवर शिवसेनेने आपले मावळे उभे केले असून मुंब्य्रातील ११ जागांवर मात्र उमेदवार दिलेले नाहीत. यादीवर नजर टाकल्यास यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वाधिक वर्चस्व दिसून आले. वागळे इस्टेट, किसननगर भागात त्यांच्या मर्जीतील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच देवराम भोईर अ‍ॅण्ड कंपनीही त्यांच्याच पठडीतील असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे राम आणि विकास रेपाळे, शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आदींना उमेदवारी मिळाली आहे. महापौर संजय मोरे यांची पत्नी आदींसह इतर मावळे हे शिंदे यांच्याच तालमीतील असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आ. प्रताप सरनाईक यांनीदेखील पत्नी आणि मुलाला तिकीट मिळवले असून संदीप डोंगरे यांच्या पत्नीला तिकीट मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. तर, घोडबंदर भागातही त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळवून दिले आहे. त्याखालोखाल विधान परिषदेचे आ. रवींद्र फाटक यांनीही पत्नी, वहिनी, तसेच आपल्यासोबत काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्यांना तिकीट मिळवून दिले आहे. आमदार सुभाष भोईर यांनीदेखील आपल्या मुलाला तिकीट मिळवले आहे. दरम्यान, खासदार राजन विचारे यांनी आपली पत्नी आणि घरच्यांना तिकीट मिळवले असून इतर पदाधिकाऱ्यांना मात्र नाराज केले आहे. त्यांच्या अनेक समर्थकांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे या नाराजांनी बंडाळी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निष्ठावान विलास ढमाले, पूजा वाघ, बाळा घाग आणि त्यांच्या पत्नीने प्रभाग क्र मांक १७ मधून उमेदवारी दाखल केली आहे. माजी नगरसेवक मदन कदम यांनीदेखील पत्नी नीता कदम यांच्यासह चार उमेदवारांचे पॅनल तयार केले आहे. अश्विनी जगताप यांनी प्रभाग क्र मांक १८ आणि प्रभाग क्र मांक ३ मधून आनंद केसरे यांना पक्षाच्या एबी फॉर्म दिला नसताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्ष म्हणून दाखल केला आहे. शिवसेनेचे वागळे उपविभागप्रमुख अजिनाथ वायकुळे यांनी प्रभाग १५ ब बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)शिवसेना उपशहरप्रमुखांचे पत्नीसह उपोषणठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना उपशहरप्रमुख विलास ढमाले व त्यांच्या पत्नी मंजिरी ढमाले यांनी शनिवारपासून टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरु केले आहे. तसेच या भागातील उमेदवारी दिलेल्या पवन कदम यांच्या घराला घेराव घालून उमेदवारी मागे न घेतल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे.