शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:16 IST

शेलार हल्लाप्रकरण : दोन आरोपी फरार

सदानंद नाईकउल्हासनगर : मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावरील हल्लाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने महापालिका महिला व बालकल्याण अधिकारी सचिन वानखेडेसह दोघांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वी गुन्हे विभागाने चौघांना अटक केली असून दोघे फरार असल्याची माहिती गुन्हे विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे.

शेलार यांच्यावर अंबरनाथ गोविंद पुलाजवळ चार अनोळखी इसमांनी ८ ऑक्टोबरला तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करून कल्याणमध्ये राहणाऱ्या चारजणांना अटक केली.  मात्र, हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला. शेलार यांनी मनपा शिक्षण मंडळासह अवैध बांधकाम, अन्य समस्यांविरुद्ध आवाज उठविला असून यातूनच आपणावर हल्ला झाला असावा, अशी शंका व्यक्त केली होती. पोलिसांनी चौघांना बोलते केले असता, फरार असलेल्या धर्मेश व नागेश यांनी आम्हाला मारण्यास सांगितल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात अटक झालेल्या चौघांचे मोबाइल संभाषण तपासले असता,  धर्मेश, नागेशसह संतोष पगारे व  वानखेडे यांचे संभाषण झाल्याचे उघड झाले. यातून पगारे याच्यासह वानखेडे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केल्याची माहिती तरडे  यांनी दिली. 

‘त्यांच्याशी संबंध नाही’ सचिन वानखेडे व माझा कधीही संबंध आला नाही. तसेच त्यांच्याकडे त्यांची वैयक्तिक व विभागासंदर्भात कोणतीही माहिती मागितली नाही. मग, माझ्या हल्ल्यामागील सूत्रधार महापालिका अधिकारी कसा काय होऊ शकतो, याबाबत शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर