शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडकपाडा पोलीस ठाण्याचा १५ सप्टेंबर पूर्वी श्रीगणेशा

By admin | Updated: August 25, 2015 23:02 IST

कल्याणात नव्या सुरू होणाऱ्या खडकपाडा पोलीस ठाण्याला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- पंकज रोडेकर,  ठाणेकल्याणात नव्या सुरू होणाऱ्या खडकपाडा पोलीस ठाण्याला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याची संख्या ३४ होणार आहे. कल्याण शहरातील खडकपाडा परिसराचा गेल्या वर्षापासून झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे येथे पोलीस ठाणे असावे, अशी मागणी होऊ लागली होती. याचदरम्यान, तत्कालीन मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या त्या पाठपुराव्याला यश आले होते. ३ मार्च २०१४ रोजी त्या पोलीस ठाण्याला गृह विभागाकडून हिरवा कंदील मिळाला होता. या नव्या पोलीस ठाण्यामुळे बाजारपेठ आणि महात्मा फुले या पोलीस ठाण्याची हद्द कमी होणार आहे. पोलीस ठाण्याची इमारत महापालिकेच्या आरक्षित जागेत उभारली आहे. ती तळ अधिक तीन मजली आहे. मात्र, मंजूर नसलेल्या मनुष्यबळामुळे हे पोलीस ठाणे सुरू करण्यास मुहूर्त लागत नव्हता. आता ते मंजूर झाल्याने लवकर हे पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातील तीन नंबरचे परिमंडळ असलेल्या कल्याण झोनमध्ये सध्या सात पोलीस ठाणी आहेत. त्यामधील चार पोलीस ठाणी ही डोंबिवलीत असून तीन कल्याण शहरात आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याने कल्याण शहराबरोबर परिमंडळात पोलीस ठाण्याची संख्या एकने वाढणार आहे. याच नव्याने सुरू होणाऱ्या ठाण्याच्या हद्दीत अप्पर पोलीस आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त कार्यालये आहेत. याबाबत लवकरच अधिसूचना काढून खडकपाडा पोलीस ठाणे सुरू करण्यात येईल. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत ते सुरू करण्याचा प्रयत्न आहे.’’- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर